पत्नीचं छाटलेलं मुंडकं स्कूटरवर ठेवून करत बसला Ride, पतीला आला अनैतिक संबंधाचा संशय अन्...

मुंबई तक

crime news : बंगळुरूत एका पुरूषाने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. त्याने पत्नीचं छाटलेलं मुंडकं एका स्कूटरवर ठेवलं आणि तो चंदपुर - अनेकल मार्गावर प्रवास करु लागला असता, घटनेचा खुलासा झाला.

ADVERTISEMENT

crime news husband beheaded his wife after suspecting her of having an immoral relationship
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बंगळुरूत एका पुरूषाने आपल्याच पत्नीची केली हत्या

point

या घटनेचं सत्य समोर आलं आणि पोलिसांना संबंधित आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या

Crime News : बंगळुरूत एका पुरूषाने आपल्याच पत्नीची हत्या केली आहे. त्याने पत्नीचं छाटलेलं मुंडकं एका स्कूटरवर ठेवलं आणि तो चंदपुर - अनेकल मार्गावर प्रवास करु लागला. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला थांबवले आणि घटनेचा खुलासा झाला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आरोपी पती हा स्वत:हून पोलीस ठाण्यात गेला आणि सरेंडर झाला.

हेही वाचा : बॉयफ्रेंड राज सोनमला सगळ्यांसमोर दीदी बोलायचा, पण नंतर भलतंच... राज कुशवाहच्या आईने उडवली खळबळ!

आरोपीचे नाव शंकर वय वर्षे 28 आहे, तर पीडित मानसा ही वय वर्षे 26 आरोपीची पत्नी आहे. ती हेब्बागोडी येथील रहिवासी असल्याचे तपासातून समोर आले. त्यांचे पाच वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं. त्यांना तीन वर्षांची एक मुलगी, असं त्यांचं कुटुंब होतं. 

नेमकं काय घडलं? 

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, पती आणि पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. शंकर हा कोरमंगला आणि पत्नी मानसा ही बोम्मासंद्र येथे नोकरी करत होती. हीलालिगे या गावात ते भाडेतत्वार राहत होते. या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या पत्नीचे बाहेर अवैवाहिक संबंध असल्याचा पतीला संशय आला होता. याच कारणावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. त्यानंतर हे वाद वाढू लागल्याने पत्नीने घर सोडलं. 

पत्नी मानसाने घर सोडून पेइंग गेस्ट म्हणून राहू लागली. मात्र, त्यांना एक छोटी मुलगी असल्याने ती पुन्हा पतीसोबतच राहू लागली. मात्र, त्यांच्यातील वाद थांबायचं नाव घेईना. दरम्यान, पतीने लोखंडी धारदार कुऱ्हाडीने पत्नी मानसावर हल्ला केला. त्यावेळी त्याने आपल्या पत्नीचं मुंडकं छाटून काढलं. पत्नीचं छाटलेलं मुंडकं पतीनं आपल्या गाडीवर ठेवलं आणि तो चंदपुर अनेकला मार्गे निघाला असता, तिथे ड्युटीवर असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला थांबवलं आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.  

हेही वाचा : आधी मिठी मारतो नंतर Kiss करतो.. सीरियल किसरचा धुमाकूळ, महिलांमध्ये प्रचंड भीती!

आरोपी पुरूष पोलीस ठाण्यात झाला सरेंडर

दरम्यान, शनिवारी सकाळी आरोपी हा सूर्यनगर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि सरेंडर झाला. यावेळी त्याने आपण खून केला असल्याचा कबुली जबाब दिला. यादरम्यान सूर्यनगर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp