Ladki Bahin Yojana: महिलांना 3000 रुपये मिळणार की नाही?, सर्वात मोठी बातमी आली समोर
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केली आहे. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. या महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेल्यांना 3000 मिळणार
जुलै आणि ऑगस्ट असा दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार
दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या टप्प्याचा (Second Term) शुभारंभ देखील शनिवारी पार पडला आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात (Women Account) आता 3000 रूपये जमा व्हायला सुरूवात केली आहे. पण असे असले तरी काही महिलांना 3000 रूपयांपासून मुकावे लागणार आहे.या महिला कोण असणार आहेत? हे जाणून घेऊयात.(ladki bahin yojana scheme 3000 will not be deposited in the women account aditi tatkare gadchiroli mukhyamantri ladki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी केली आहे. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. या महिलांना दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच 31 ऑगस्टनंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना तीन हजार रुपयांच्या लाभाला मुकावे लागणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
हे ही वाचा : Narayan Rane: 'म्हणून आदित्य ठाकरेला जाऊ दिलं', सिंधुदुर्गात काय घडलं ते राणेंनीच सांगितलं!
गडचिरोलीमध्ये आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे. 31 ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी या पुढेही कायम राहणार आहे.
हे वाचलं का?
दरम्यान आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांपर्यंत अर्ज करण्यात आले असून, राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी सरकारची धारणा आहे. राज्याच्या महिला आणि बालविकस विभागाने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली आणि 17 ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपायाप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली.
2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pune Crime: बहिणीचं मुंडकं छाटलं, भाऊ-वहिनीने अशी केली हत्या की, अवघं पुणं हादरलं!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT