Telengana : डोळ्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ब्लेडने गळा चिरळा, 19 वर्षीय तरूणीची निर्घृण हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

telengana Vikarabad murder screwdriver inserted eyes throat slit blade 19 years odl girl murder
telengana Vikarabad murder screwdriver inserted eyes throat slit blade 19 years odl girl murder
social share
google news

Telengana Murder Case : दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने 40 वेळा भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता तेलंगणातून (Telengana murder) हादरवणारी घटना समोर आली आहे. विकाराबाद जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरूणीच्या डोळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करत ब्लेडने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. जुट्टू सिरीशा असे या मृत तरूणीचे नाव आहे. तरूणीच्या या निधनाने सपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी (police) तपास सूरू करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. (telengana murder screwdriver inserted eyes throat slit blade 19 years odl girl murder)

तेलंगणाच्या (Telengana murder) विकाराबाद जिल्ह्यातील परीगी मंडळच्या कल्लापूरात गावात 19 वर्षीय जुट्टू सिरीशा राहायची. या कल्लापूर गावच्या नजीक असलेल्या तलावात तरूणीची हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता. ग्रामस्थांनी ही घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. या तरूणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तरूणीच्या डोळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला होता तसेच नंतर ब्लेडने निर्घृण हत्या केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, जुट्टू सिरीशा ही तरूणी शनिवारी रात्री 11 वाजता घरातून निघाली होती. मात्र नंतर ती परतलीच नाही. या दरम्यानच तिची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : एक कोटी, नेपाळचा माफिया आणि मुंबईत ‘डील’! संजीव जीवा हत्येची स्टोरी

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठीही पाठवण्यात आला आहे. आता या प्रकरणात नेमकी तरूणीची इतकी निर्दय़ीपणे हत्या का करण्यात आली आहे?तिच्या हत्येमागचं कारण काय आहे? या सर्व गोष्टींचा आता तपास केला जात आहे. तसेच तरूणीच्या कुटुंबियांसह, मित्र-मैत्रिणींची चौकशी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास केला जातोय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याआधी दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात काही दिवसांपुर्वी वरील घटनेपेक्षा धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत एका 16 वर्षीय तरूणीची चाकूने 40 वेळा भोसकून व नंतर गटाराच्या झाकणाने अनेकदा ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. भरस्त्यात आरोपीने या तरूणीची हत्या केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. साक्षी नावाच्या तरूणीची तिच्याच बॉयफ्रेंडने इतक्या निर्दयीपणे हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, साहिल आणि साक्षी दोघेही चांगले मित्र होते.मात्र या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने हे हत्याकांड घडवल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा आता तपास सुरु आहे.

हे ही वाचा :  Kanpur Crime : तीन दिवसांपूर्वी लग्न… प्रायव्हेट पार्ट फेकला कापून

    follow whatsapp

    ADVERTISEMENT