Crime: मुलांसोबत सैतानी कृत्ये! गुप्तांगात भरली मिरची पावडर, मानवी मूत्र पाजलं अन्…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

two minor children suspicion theft chili powder was put in the genital area and human urine was consumed uttar predesh siddharthnagar crime news
two minor children suspicion theft chili powder was put in the genital area and human urine was consumed uttar predesh siddharthnagar crime news
social share
google news

Uttarpradesh Crime News: सिद्धार्थनगर: उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सिद्धार्थनगर जिल्ह्यात एक अशी घटना घडली की, ज्यामुळे प्रत्येक संवेदनशील माणसाचं काळीज पिळवटून निघेल. काही असे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यांनी अमानुषतेची परिसीमा ओलांडली आहे. तसंच काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण सविस्तपणे समजून घेऊयात. (two minor children suspicion theft chili powder was put in the genital area and human urine was consumed uttar predesh siddharthnagar crime news)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे (Minor Boys) हात बांधलेले दिसत आहे. ज्यामध्ये त्याला इंजेक्शन दिलं जात असल्याचं दिसतं आहे. एवढेच नाही तर सर्वात भयंकर बाब म्हणजे लहान मुलांना विवस्त्र करून त्यांच्या गुप्तांगात हिरव्या मिरच्या टाकल्या जात आहेत.

हे ही वाचा >> Ratnagiri: नीलिमा चव्हाण शेवटची भेटलेली ‘त्या’ जोडप्याला.. नेमकं काय घडलं?

दोन अल्पवयीन मुलांवर चोरीचा आरोप

नराधम लोकं एवढ्यावरच थांबले नाही तर मारहाण करणाऱ्यांनी या अल्पवयीन मुलांना मानवी मूत्र देखील प्यायला लावलं. वास्तविक या दोन अल्पवयीन मुलांवर चोरी केल्याचा संशय असल्याने त्यांच्यासोबत हे भयंकर कृत्य करण्यात आलं. या पीडित अल्पवयीन मुलांपैकी एक 15 वर्षांचा तर दुसरा अवघ्या 10 वर्षांचा आहे. या दोन्ही मुलांना आधी सुक्या मिरच्या खाण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर त्यांना मानवी मूत्र प्यायला लावल्याचं व्हायरल व्हिडीओतून समोर आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Titwala crime news : पत्नीने घोटला गळा, अन्…; पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे फुटलं बिंग

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडिओ सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पाथरा पोलीस स्टेशन हद्दीतील कोंकटी चौराहाजवळ असलेल्या अरशान चिकन शॉपजवळील आहे.

अल्पवयीन मुलांसोबत तालिबानी कृत्य

ही संपूर्ण घटना 4 ऑगस्टची आहे. या प्रकरणाबाबत एएसपी सिद्धार्थ म्हणाले की, ‘दोन मुलांसोबत आक्षेपार्ह कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला होता. याची तातडीने दखल घेत तक्रार दाखल करून संबंधित कलमांतर्गत गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत.’ पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्यांची ओळख पटवली असून आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता याप्रकरणी सविस्तर तपास केला जाईल आणि जी काही तथ्य समोर येतील त्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT