"साहेब बाथरुमला जायचंय..", न्यायालयातून आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळाला

मुंबई तक

UP Crime News : बांदा न्यायालयात आणलेला आरोपी संजय बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांना चकवा देऊन फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या चार टीम तैनात करण्यात आल्या असून सीसीटीव्ही आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"साहेब बाथरुमला जायचंय.."

point

न्यायालयातून आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळाला

UP Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत तुरुंगात असलेला आरोपी न्यायालयात सुनावणीसाठी आणल्यानंतर पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे. संजय असे या आरोपीचे नाव असून, 14 ऑगस्ट रोजी न्यायालय परिसरात ही घटना घडली. संजयला जेलमधून बांदा न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालय परिसरातील हवालातीत त्याला ठेवण्यात आले होते आणि त्याच्यावर पोलिसांची नजर होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना संजयने पोलिस कर्मचाऱ्याला बाथरूमला जायचे असल्याचे सांगितले. पोलिस कर्मचाऱ्याने त्याला बाथरूमला जाण्याची परवानगी दिली. मात्र, बाथरूमला गेलेला संजय पुन्हा परतलाच नाही. सुरुवातीला पोलिस कर्मचाऱ्याला तो परत येईल असे वाटले. मात्र बराच वेळ उलटूनही संजय परत न आल्याने त्याला संशय आला आणि त्यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.

हेही वाचा : Independence Day LIVE: स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन

बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने आरोपी पळाला 

संजय हा खप्टिहा कला गावचा रहिवासी असून, गांजा तस्करीच्या प्रकरणात आरोपी आहे. त्याच्याविरोधात चिल्ला पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. जून महिन्यापासून तो तुरुंगात होता. 14 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी जेलमधून बांदा येथे आणण्यात आले होते. न्यायालय परिसरातील हवालातीत त्याला ठेवण्यात आले होते. यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी पोलिस कर्मचारी तैनात होते. मात्र बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने संजयने पोलिसांना चकवा दिला आणि तेथून पळ काढला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने पोलिसांनी त्याचा परिसरात शोध सुरू केला. न्यायालय परिसर तसेच आजूबाजूच्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

हेही वाचा : बागेत आढळला गर्भवती तरुणीचा मृतदेह, दोन प्रियकरांवर गुन्हा; गर्भ नेमका कुणाचा?