Independence Day LIVE: स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन
PM Modi LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदी कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: देश आज 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाकडे देशभरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सोहळ्याला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर आगमन झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.
यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय ध्वज फडकावला. ध्वजारोहणानंतर सुरक्षा दलांकडून पंतप्रधानांना राष्ट्रीय सलामी देण्यात आली. बँडने राष्ट्रगीताची धून वाजवली आणि यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली.
PM मोदींचं देशाला संबोधन
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणातून ते देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.
