Crime: रक्ताच्या चिळकांड्या अन् दगडाने ठेचलेला मृतदेह; शौचालयात अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. झाशी येथे एका अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. झाशी येथे एका अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय आहे. (Uttar Pradesh Crime Story Minor Girl Killed brutally by stone half naked found in washroom)
ADVERTISEMENT
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु अजूनही त्यांना या घटनेत दोषी ठरवणारा कोणताही सुगावा सापडलेला नाही. तर दुसरीकडे मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाचा: Maratha Reservation: जरांगे पाटलांचं ठरलं म्हणाले, ‘…तर आम्ही फडणवीसांच्या घरात जाऊन बसू’
अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
झाशीच्या बाबिना भागात गोचीखेडा येथे ही घटना घडली. गोचीखेडा हे बबिना पोलीस ठाण्यांतर्गत आदिवासी वस्ती असलेले ठिकाण आहे. मृत मुलीचे वय 17 वर्ष होते. या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व परिसरातील पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुरुवारी (28 डिसेंबर) सायंकाळी ही मुलगी घरातून शौचालयाला गेली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही.
हे वाचलं का?
मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शुक्रवारी (29 डिसेंबर) सकाळी तिचा मृतदेह त्यांच्या कॉलनीपासून 100 मीटर अंतरावर अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. मृतदेह पाहिल्यानंतरच मुलीवर बलात्कार करून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुलगी बाहेर शौचास गेली होती
मुलीच्या आईने सांगितल्यानुसार, त्यांची मुलगी संध्याकाळी घराबाहेर शौचास गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळी अर्धनग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.
ADVERTISEMENT
वाचा: Z+ Security म्हणजे काय आणि ती कोणाला दिली जाते?
रक्ताचा सडा अन् दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह
या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सकाळी अर्धनग्न अवस्थेत एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. प्राथमिक तपासात हा मृतदेह १६-१७ वर्षांच्या मुलीचा असल्याचे समोर आले. जी आदल्या दिवशी संध्याकाळपासून बेपत्ता होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन घटनेचा आढावा घेतला. मुलीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
ADVERTISEMENT
वाचा: Shiv Sena UBT: ‘त्या एका जिद्दीने मी उभा आहे…’, उद्धव ठाकरेंनी थेट मोदींनाच दिलं चॅलेंज!
सध्या पोलिसांना घटनास्थळावरून हे कू कृत्य करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यास मदत होईल असा कोणताही सुगावा मिळालेला नाही. पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून जवळच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT