Yashashree Shinde news : यशश्रीची ज्या कोयत्याने केली हत्या, तो कुठे सापडला? Inside Story

मुंबई तक

Yashashree Shinde Dawood Shaikh : यशश्री शिंदेंची दाऊद शेखने कोयत्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा कोयता जप्त केला असून, मोबाईलचा शोध पोलीस घेत आहे. 

ADVERTISEMENT

यशश्री हत्या प्रकरणात दाऊद शेखचे खुलासे.
दाऊद शेखने यशश्रीची हत्या केल्यानंतर कोयता कुठे फेकला होता?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

यशश्री शिंदेंच्या हत्येची कहाणी

point

दाऊद शेखने पोलिसांना काय सांगितलं?

point

दाऊद शेखने यशश्री शिंदेला ब्लॅकमेल कसे केले?

Yashashree Shinde Latest News : उरणमधील २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांनी दाऊद शेख याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली जात असून, यशश्रीची हत्या कशी केली आणि हत्या केल्यानंतर काय केले, याचा घटनाक्रम आता समोर आला आहे. (how dawood Shaikh did kill yashashree shinde in uran) 

दाऊद शेख पोलीस कोठडीत असून, त्याची चौकशी केली जात आहे. यशश्रीची हत्या लग्नाला नकार दिल्याच्या रागातून करण्यात आल्याची दाऊदने कबुली दिली आहे. तिच्या हत्येचा घटनाक्रम दाऊद शेखने सांगितला. 

यशश्रीवर कोयत्याने केले वार

दाऊद शेखने यशश्री शिंदेच्या हत्येसाठी धारदार कोयत्याचा वापर केल्याचे तपासातून समोर आले आहे. हत्या केल्यानंतर त्याने यशश्रीचा मोबाईल घेतला आणि प्रवास करत असताना फेकून दिला. 

दाऊदने यशश्रीची हत्या केल्यानंतर काय केले?

लग्नाला नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. रागात दाऊद शेखने कोयता काढून यशश्रीवर हल्ला केला. हत्या केल्यानंतर घटनास्थळापासून जवळच असलेल्या उरण स्थानकात तो गेला. त्यानंतर बेलापूरला जाण्यासाठी लोकल पकडली.

हे वाचलं का?

    follow whatsapp