दुसऱ्या महिलेसोबत सुरू होतं गॅटमॅट, पत्नीने पतीचा कार्यक्रमच करून टाकला!
Wife Kills Husband Crime News : बिहारच्या मुजफ्फपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे 7 जुलैला एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीचं दुसऱ्या महिलेसोबत सुरु होतं अफेअर

पत्नीने पतीचा केला खून अन् जंगलात

पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर
Wife Kills Husband Crime News : बिहारच्या मुजफ्फपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे 7 जुलैला एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. मोहम्मद मुमताज असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मृत व्यक्ती या जिल्ह्यात रोजगार सेवक होता. पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या हत्याप्रकरणी एक खुलासा केला आहे.
मोहम्मद मुमताजची हत्या त्याच्याच पत्नीने केली होती. सबा परवीन असं आरोपी पत्नीचं नाव आहे. काजी मोहम्मदपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसच पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलांचीही चौकशी केली. या तपासाच्या आधारावर पोलिसांना मृत व्यक्तीच्या पत्नीवर संशय आला. त्यानंतर त्यांनी आरोपी पत्नीला रिमांडवर घेतलं.
दुसऱ्या महिलेसोबत सुरु होतं अफेअर
पोलीस चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं कबूल केलं की, तिनेच तिच्या पतीची हत्या केली. महिलेनं सांगितलं की, पतीला बेशुद्ध करण्यासाठी आधी त्याच्यावर हातोड्याने हल्ला केला. त्यानंतर धारदार शस्त्राने पतीची हत्या केली. आरोपी पत्नीने म्हटलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरु होतं. त्यामुळे ती नाराज होती. त्यामुळे तिने पतीच्या हत्येचा गुन्हा केला.
हे ही वाचा >> महिलेला पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर व्हिडिओ कॉल करत दाखवू लागला गुप्तांग, रात्री 12 वाजता काय घडलं?
हत्या केल्यानंतर सामान जंगलात फेकलं
पोलिसांनी आरोपी महिलेच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर, मोबाईल आणि अन्य सामान जप्त केलं आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेनं पतीला बेशुद्ध करण्यासाठी त्याच्यावर हातोड्याने वार केले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा खून केला. हत्या केल्यानंतर डीव्हीआर आणि मोबाईलसह अन्य सामान जंगलात फेकला.
त्या ठिकाणीही घडली होती संतापजनक घटना
उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये धक्कादायक घटना घडली होती. 8 वर्षीय विवाहित व्यक्ती मुकीमने 37 वर्षांच्या शबनमचा गळा चिरून हत्या केली होती. अनैतिक संबंधांचा पर्दाफाश झाल्याने त्याच्या पत्नीला आणि मुलांना याबाबत कळलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली होती.