Wife Swapping: पार्टीत रंगला ‘वाईफ स्वॅपिंग’चा खेळ, तरुणांसोबत विवाहित महिला; अन् तेव्हाच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

wife swapping party racket busted chennai police raid and 8 arrested boys were with married woman
wife swapping party racket busted chennai police raid and 8 arrested boys were with married woman
social share
google news

Wife Swapping Sex Racket: चेन्नई: चेन्नईतील ईस्ट कोस्ट रोडवरील (ECR) पानियूर येथे सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून चक्क वाईफ स्वॅपिंग सुरू असल्याची अत्यंत धक्कदायक माहिती नुकतीच समोर आली आहे. वाईफ स्वॅपिंग पार्ट्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा चेन्नई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (wife swapping party racket busted chennai police raid and 8 arrested boys were with married woman)

ADVERTISEMENT

चेन्नई तसेच कोईम्बतूर, मदुराई, सालेम आणि इरोड या टायर-टू शहरांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मुले-मुली आढळून आली. नंतर या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली.

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, चौकशीत समोर आले की, अटक करण्यात आलेल्यांमध्ये – सेंथिल कुमार, कुमार, चंद्रमोहन, शंकर, वेलराज, पेरासन, सेल्वन आणि व्यंकटेशकुमार यांचा समावेश आहे. या लोकांनी आधी अविवाहित पुरुषांना टार्गेट केले आणि नंतर काही महिलांना त्यांची पत्नी म्हणून ओळख दिली. त्यानंतर त्यांना ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली पार्टनर बदलण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

हे वाचलं का?

एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, “या टोळीने बायको-स्वॅपिंगसाठी सोशल मीडिया पेज तयार केले आणि पुरुषांना 13,000 ते 25,000 रुपयांचे आमिष दाखवले.” ते जितके जास्त पैसे देतील तितक्या जास्त महिला त्यांच्यासोबत राहतील असंही त्यांना सांगण्यात आलं.

हे ही वाचा>> Crime : मोबाईलमधील अश्लील फोटोमुळे आत्महत्येचं उलगडलं गूढ; सांताक्रुझमधील ‘ते’ प्रकरण काय?

आठ जणांच्या अटकेव्यतिरिक्त, अँटी-व्हॅस स्क्वॉड अधिकार्‍यांनी सोमवारी पहाटे 30 ते 40 वर्षे वयोगटातील अनेक महिलांची सुटका केली. त्या सर्व विवाहित महिला होत्या, परंतु स्वॅप पार्टीसाठी मोठ्या रकमेचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, ज्या घरामध्ये हा वेश्याव्यवसाय सुरू होता तेथील शेजाऱ्यांच्या सजगपणामुळेच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घरात मोठ्या प्रमाणात लोक येत असल्याचे आणि मध्यरात्रीनंतरही जोरजोरात गाणी सुरू असल्याचे लक्षात आल्याने शेजाऱ्यांनी याबाबच पोलिसांना कळवलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Crime: कपटी वहिनीचे अनैतिक संबंध… नवऱ्याला सांगून नणंदेची क्रूर हत्या!

या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक एनएस कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने पनीयुरच्या घरावर छापा टाकला. यावेळी काही मध्यमवयीन तरुण हे महिलांसोबत वेगळ्या खोलीत असल्याचे त्यांना आढळले. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे, तर सुटका करण्यात आलेल्या महिलांना लेखी संमती दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह जाण्याची परवानगी देण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आठ जणांना दंडाधिकारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT