बापरे, 'या' महिलेचा 'प्लॅन' झाला असता यशस्वी तर... सगळी वाटच लागली असती!

मुंबई तक

Crime News: घरगुती वादाला कंटाळून एका महिलेने कुटुंबातील 8 जणांना मारण्यासाठी चपातीच्या पिठात विष मिसळल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

कुटुंबीयांना मारण्याचा महिलेने रचलेला कट (Screen Grab)
कुटुंबीयांना मारण्याचा महिलेने रचलेला कट (Screen Grab)
social share
google news

कौशाम्बी: उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे घरगुती वादामुळे अस्वस्थ झालेल्या एका महिलेने संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट रचला. डोक्यातील राग शांत करण्यासाठी या महिलेने तिच्या वडिलांसह एक भयंकर कट रचला. महिलेने चक्क चपातीच्या पिठात विष मिसळलं, ज्यामुळे एक-दोन नव्हे तर कुटुंबातील 8 जणांचे जीव धोक्यात आला.

नेमकी घटना काय?

घरगुती वादानंतर मालती देवी ही अत्यंत संतापली होती. तिने संपूर्ण कुटुंबाला धडा शिकवायचा या दृष्टीने चक्क पिठात सल्फास मिसळलं होतं. त्यानंतर जणू काही घडलंच नाही या अविर्भावात तिने घरकामला सुरुवात केली.

हे ही वाचा>> नोकरीचं आमिष दाखवून घरी बोलावलं अन् बांधून ठेवलं.. 62 वर्षांच्या नराधमाने 3 महिलांवर केला बलात्कार

दरम्यान, जेव्हा घरात चपात्या बनविण्यास सुरूवात झाली तेव्हा मालती देवीची मोठी जाऊबाई मंजू देवी हिला पिठात काही तरी वेगळा पदार्थ मिसळलं असल्याचा दाट संशय आला. त्यामुळे मंजू देवी हिने मळलेल्या पिठाला हात लावून पाहिला त्याच क्षणी तिला पिठातून एक वेगळीच दुर्गंधी येऊ लागली. 

त्यामुळे तिचा संशय अधिक बळावला. ज्यानंतर तिने घरातील सर्व सदस्यांना याबाबतची ताबडतोब माहिती दिली. यामुळे संपूर्ण कुटुंबीयांनी मालती देवीची कसून चौकशी केली. कुटुंबातील सदस्यांनी ज्या पद्धतीने मालती देवीवर प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा>> कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

यावेळी मालती देवीने सांगितले की, ती दररोजच्या घरगुती भांडणांमुळे आणि मानसिक ताणामुळे त्रस्त होती. म्हणूनच तिने तिच्या वडिलांच्या मदतीने हे भयानक पाऊल उचलले होते.

महिलेने रचलेले संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. SSP राजेश सिंह म्हणाले की, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला आणि तिच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या वडिलांना केली अटक

मालती देवीचा पती ब्रिजेश कुमार यांनीही या घटनेची पुष्टी केली की, घरात बराच काळ भांडणे सुरू होती. त्यामुळेच पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं असणार. 

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर गावात दहशत पसरली आहे. जर पिठातून वेळीच दुर्गंध आला नसता तर या कुटुंबात मोठा घातपात घडला असता. आता या प्रकरणी पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp