दारू पिण्याची तलप आली..बायकोच्या दागिन्यांवर हात टाकला! संतापलेल्या पत्नीनं पतीला संपवलं अन् नंतर..

मुंबई तक

Wife Killed Husband Crime News :  उत्तरप्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात दारू पिण्यासाठी सोन्याचे दागिने विकणाऱ्या पतीची पत्नीनं हत्या केली. पत्नीने पतीच्या डोक्यावर लाकडी दांडकाने हल्ला केला.

ADVERTISEMENT

प्रतीकात्मक चित्र
प्रतीकात्मक चित्र
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दारू पिण्याची इच्छा पतीच्या जीवावर बेतली

point

संतापलेल्या पत्नीनं पतीला संपवलं

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Wife Killed Husband Crime News :  उत्तरप्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात दारू पिण्यासाठी सोन्याचे दागिने विकणाऱ्या पतीची पत्नीनं हत्या केली. पत्नीने पतीच्या डोक्यावर लाकडी दांडकाने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. पडरौना कोतवाली परिसरातील जंगलात बकुलहा ब्रम्हस्थानजवळ ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. 

जंगल बकुलहा ब्रम्हस्थान येथे राहणाऱ्या लालचंदला दारू पिण्याचं व्यसन होतं. त्यामुळे पत्नी किरणसोबत त्याचं नेहमीच वादविवाद व्हायचे. शनिवारी शाम लालचंदने दारूसाठी पत्नीचे दागिने विकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी पत्नीने त्याला रोखलं आणि त्याच्यावर दांडकाने हल्ला केला. लालचंद जमिनीवर खाली पडला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 

स्थानिक लोकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लालचंदचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. लालचंदची वहिनी सोनमतीच्या तक्रारीनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. लालचंदला चार मुलं आहेत. पोलीस अधिकारी हर्षवर्धन सिंह यांनी म्हटलं की, डोक्यावर लाकडी दांडकाने हल्ला केल्याने पतीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.

हे ही वाचा >> महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं

त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना

दरम्यान, कुशीनगरच्याच हाटा कोतवाली परिसरात पोलिसांनी हुंडाबळीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना त्यांच्या घरातून अटक केली होती. हाटानगरच्या वॉर्ड नंबर 24 हरिटोला येथील आरोपी ओमप्रकाश विश्वकर्मा, किशन विश्वकर्मा आणि आरोपी ज्ञान्ती यांच्यावर कारवाई केली.राजेश कुमार चौधरी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो गिरिडीह गावाचा रहिवासी होता. राजेश कोलाबीरातील डीडी स्टीलमध्ये लॅब टेक्निशिअन म्हणून काम करत होता. कामानिमित्ताने तो कुटुंबापासून दूर राहत होता पण नुकतंच सोमवारपासून तो आपल्या पत्नीसोबत राहायला सुरूवात केली होती. पण पत्नीने त्याची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा >> पतीसोबत वाद आणि दुसऱ्याच तरुणाशी जुळलं सूत! पतीने रचला मोठा कट, प्रियकराच्या घरीच गेला अन् थेट...

हे वाचलं का?

    follow whatsapp