62 वर्षांचा 'तो' आरोपी कोण? 3 महिलांवर केला बलात्कार

मुंबई तक

Prafulla lodha Crime News :  देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात भयंकर घटना  घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नोकरी देण्याचं आमिष दाखवून तीन महिलांसोबत अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली.

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी नराधम प्रफुल्ल लोढाच्या आवळल्या मुसक्या

point

नोकरीचं आमिष दाखवून मुलींचं केलं लैंगिक शोषण

point

तिसऱ्या महिलेवरही केला लैंगिक अत्याचार

Prafulla lodha Crime News :  देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात भयंकर घटना  घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नोकरी देण्याचं आमिष दाखवून तीन महिलांसोबत अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. 62 वर्षांच्या नराधमाने दोन अल्पवयीन मुलींना बांधून ठेवलं. त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि त्यांचे अश्लील फोटो काढले. अशाचप्रकारे त्याने तिसऱ्या महिलेलाही वासनेचं शिकार बनवलं.

एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, तिन्ही पीडित महिलांच्या तक्रारीच्या आधारावर आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. आरोपी राज्यातील भाजप नेत्याचा जवळचा सहकारी असल्याचं बोललं जात आहे. 

हे ही वाचा >> कर्माचं फळ! भाजप नेते प्रफुल्ल लोढांना हनी ट्रॅप प्रकरणात अटक, तरुणींचे अश्लील फोटो बनवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

नोकरीचं आमिष दाखवून मुलींचं केलं लैंगिक शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव प्रफुल्ल लोढा आहे. त्याच्या विरोधात साकीनाका आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. 5 जुलै रोजी चकाला परिसरात त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं नोकरी देण्याचं आमिष दाखवून दोन मुलींना घरी बोलावलं होतं.

त्यानंतर त्याने काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्या मुलींना बंधक बनवून ठेवलं. त्यानंतर जबरदस्ती शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यांचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याचं लैंगिक शोषण केलं. अशाचप्रकारे लोढाने अंधेरीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केला.

हे ही वाचा >> विधवा महिलेसोबत सेटिंग लावली..पोलिसांची वर्दी घालून घरी भेटायला यायचा, एक दिवस झालं मोठं कांड!

जुलै महिन्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम गठित करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी जळगाव, जामनेर आणि पहुरमध्ये त्याच्या संप्पतीचा शोध घेतला. यावेळी पोलिसांना एक लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाल्या. 

हे वाचलं का?

    follow whatsapp