गळा कापून पतीला जाळलं! 3 मुलांना घेऊन पत्नी अज्ञात व्यक्तीसोबत पळाली..'त्या' रात्री घडलं होतं भयंकर
Wife Killed Husband Viral News : झारखंडच्या सराईकेला खरसावामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयामुळे पत्नीने पतीला मारलं. नंतर तिन्ही मुलांना घेऊन ती फरार झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीने पतीचा गळा कापून त्याला जाळलं अन्..

रात्री एका व्यक्तीने घरात प्रवेश केला, नंतर घडलं..

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Wife Killed Husband Viral News : झारखंडच्या सराईकेला खरसावामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयामुळे पत्नीने पतीला मारलं. नंतर तिन्ही मुलांना घेऊन ती फरार झाली. ही धक्कादायक घटना आदित्यपूरच्या सतबहनी धीराजगंज परिसरात घडली. पत्नीला संशय होता की, तिच्या पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्यानंतर महिलेनं पतीचा गळा कापून त्याला जाळून टाकलं. त्यानंतर अज्ञात व्यक्तीसोबत ती पळून गेली. पोलसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
राजेश कुमार चौधरी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो गिरिडीह येथील रहिवासी आहे. तो कोलाबोरा येथील डीडी स्टील लॅबचा टेक्नीशियन होता. राजेशने सोमवारपासूनच पत्नीसोबत राहणं सुरु केलं होतं. त्याआधी तो एकटा राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश त्याच्या मित्रांसोबत आधी समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहत होता. सोमवारी त्याची पत्नी आणि तीन लहान मुलं आदित्यपूरला पोहोचले.
हे ही वाचा >> पैसा पाणी : ट्रम्प यांच्या धमकीमुळे पेट्रोल महागणार?
त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?
पत्नीने त्याच्यावर सोबत राहण्याचा दबाव टाकला. त्यानंतर राजेशने गोरांगो मुखी नावाच्या व्यक्तीचं भाड्याने घर घेतलं. राजेशची पत्नी दररोज त्याच्यासोबत भांडण करायची, असं लोक सांगतात. गुरुवारी एक व्यक्ती त्याच्या घरी आला. त्याने म्हटलं की, त्याचा मेव्हणा आला आहे.
त्याच रात्री अज्ञात व्यक्तीसोबत मिळून त्याच्या पत्नीने राजेश कुमार चौधरीची हत्या केली. हत्येनंतर तिच्या मुलांना घेऊन त्या अज्ञात व्यक्तीसोबत ती पळून गेली. राजेशच्या हत्येमागे पत्नीचा हात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. हत्या केल्यानंतर दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. शनिवारी दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली.
हे ही वाचा >> महापालिका निवडणूक, ठाकरे बंधु एकत्र, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव...उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात सगळंच सांगितलं
सासरी केलं होतं भांडण
रायपूरमध्ये राहणाऱ्या मृताच्या भावाने म्हटलं की, राजेशची पत्नी काही दिवसांपूर्वीच गिरिडिह येथील घरी गेली होती. तिथे तिने वाद करत म्हटलं होतं की, ती आता राजेशसोबत राहणार नाही. त्याचं आचरण चांगलं नाही. त्यानंतर ती सासरहून मुलांना घेऊन आदित्यपूरला पोहोचली.