Pune: डेटिंग App वर भेटले 2 तरूण, पहिल्याच भेटीत शारीरिक संबंध; अन् नंतर.. पुण्यात भलतीच घटना

मुंबई तक

Pune Shocking Viral News : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. समलैंगिक डेटिंग अॅपवर दोन तरुणांची ऐकमेकांशी ओळख झाली.

ADVERTISEMENT

मुलाने आत्महत्या केली
मुलाने आत्महत्या केली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समलैंगिक डेटिंग अॅपमुळे घडली सर्वात भयंकर घटना

point

गुगल पे आणि फोन पे  वर पैसे ट्रान्सफर, पण तरुणासोबत...

point

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Pune Shocking Viral News : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. समलैंगिक डेटिंग अॅपवर दोन तरुणांची ऐकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर तरुणाला मारहाण करण्यात आली आणि त्याला ब्लॅकमेल केलं. ही घटना नांदेड सिटी परिसरात घडली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपीसोबत ग्राएंडर अॅपवर ओळख झाली होती. आरोपीने त्याला नांदेड सिटी गेटजवळ बोलावलं होतं. तिथून त्याला जबरदस्ती कारमध्ये बसवण्यात आलं आणि एका शेतात जाऊन त्याच्यासोबत जबरदस्ती संबंध करण्यात आले. त्याने या सर्वाचा व्हिडीओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल केलं. आरोपीने पीडित व्यक्तीकडून 100000 रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 

हे ही वाचा >> 'आता सोबत राजही आलेला आहे...', उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तेच म्हणाले; युतीबाबत नेमकं काय सुरू?

गुगल पे आणि फोन पे  वर पैसे ट्रान्सफर

पीडित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. यावर आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर पीडिताने आरोपीच्या गुगल पे आणि फोन पे वर दहा हजार रुपये ट्रान्सफर केले. जर तू या घटनेबाबत कोणाला सांगितलं, तर तुला जीवे मारण्यात येईल, अशी धमकीही त्याला देण्यात आली.

हे ही वाचा >> ग्राहकांनो! आज काय खरं नाय..सोनं गेलं लाखाच्या पार! वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

पोलिसांनी आरोपीला केली अटक 

याप्रकरणी नांदेड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जीआर 138/2025 च्या आयपीसी 2023 कलम 309(3), 115(2),351(3),131(2)(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रॉबिन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे (27) या आरोपीला अटक केली आहे. तो नांदेडफाटा, सिंहगड रोडवर राहतो. त्याला 17 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. तसच, अन्य आरोपी ओंकार मांडलिक फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याचदरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केली. पोलिसांनी सायबर गुन्हे करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp