ग्राहकांनो! आज काय खरं नाय..सोनं गेलं लाखाच्या पार! वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं समोर आलंय. आज शनिवारी 19 जुलै 2025 रोजी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घट झाली आहे.
अशातच 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99390 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91110 रुपये झाले आहेत. राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91260 रुपये झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99530 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91700 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91700 रुपये झाले आहेत.










