कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी दिलं मांत्रिकाच्या ताब्यात, महिलेवर ७९ दिवस बलात्कार

वाचा कुठे आणि कशी घडली ही धक्कादायक घटना
कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी दिलं मांत्रिकाच्या ताब्यात, महिलेवर ७९ दिवस बलात्कार
tantrik rape Married woman for 79 days solve to marital conflict husband in laws

एका महिलेने एका मांत्रिकासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपल्याला भाग पाडलं असा आरोप केला आहे. या महिलेने तिचा पती आणि तिच्या सासरच्या लोकांवर हा गंभीर आरोप केला आहे. या महिलेने केलेल्या आरोपानुसार या मांत्रिकाने घरगुती वाद सोडवण्याच्या बहाण्यातून ७९ दिवस तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेने मांत्रिक, तिचा पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ओदिशा मधल्या बालासोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं लग्न २०१७ मध्ये झालं आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच या महिलेला तिच्या सासरच्यांनी छळण्यास सुरूवात केली. तिने जेव्हा ही सगळी हकीकत आपल्या पतीला सांगितली तेव्हा पतीनेही तिलाच दोष देण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी या महिलेचा पती कामाच्या निमित्ताने बाहेर गेला.

महिलेचा पती घराबाहेर गेल्यानंतर या महिलेच्या सासूने तिला मांत्रिकाकडे नेलं. सासूने तिच्या सुनेला सांगितलं की आपल्या घरातले वाद हा मांत्रिक संपवू शकतो. मात्र काही दिवस तुला या मांत्रिकासोबत रहावं लागेल. या महिलेने यासाठी विरोध दर्शवला होता. तरीही तिच्या घरातले तिला मांत्रिकाकडे सोडून गेले असाही आरोप या महिलेने केला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

२८ एप्रिलला या महिलेला मांत्रिकाचा मोबाइल मिळाला. त्यानंतर या पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर या महिलेचे आई-वडील पोलिसांकडे गेले. पोलिसांनी मांत्रिक जिथे होता त्याला शोधून या महिलेला सोडवलं. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर मांत्रिक, महिलेचा पती आणि महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार नोंद कऱण्यात आली आहे. इंडिया टुडेसोबत बोलताना बालासोरचे एसपी सुधाशू मिश्रा यांनी सांगितलं की या प्रकरणी जलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे तसंच पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी मांत्रिकाचं नाव एस. के. तारफ असल्याचं सांगितलं आहे. महिलेने हा आरोप केला आहे की या मांत्रिकाने तिच्यावर ७९ दिवस बलात्कार केला. तसंच त्याने आपल्याला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं असाही आरोप या महिलेने सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.