Tunisha Sharma : आणखी एक सुशांत सिंह राजपूत? SSR च्या बहिणीने व्यक्त केला संशय, म्हणाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने केल्याची धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी घटना काल (शनिवारी) संध्याकाळी घडली. शुटिंगनंतर मेकअप रुममध्येच तुनिषाने स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रीनं टोकाचं पाऊल उचलल्यानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात वळीव पोलिसांनी तुनिषाचा सह कलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहम्मद खान याला अटक केली आहे.

या प्रकरणात तुनिषा शर्माच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. तिच्या आईने तक्रारीत आरोप केलाय की, ‘तुनिषा शर्मा तिचा शीजान मोहम्मद खानसह रिलेशनशिपमध्ये होती. परंतु 15 दिवसांपूर्वी शीजानने तुनिषासोबत ब्रेकअप केलं. तिला सोडून दिल्यामुळे ती नैराश्यामध्ये होती. त्याच कारणामुळे तिने नायगाव कामण येथील सेटवरील रेस्ट रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीजान मोहम्मद खानला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांचा या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येची बातमी ऐकताच सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीला मोठा धक्का बसला आहे. ट्विट करुन याबाबत धक्कादायक प्रतिक्रिया देत तिच्या मृत्यूवर संशयही व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

श्वेता सिंह किर्तीने ट्विट करत लिहिलं की, मला वाटत नाही ही आत्महत्या आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोण आत्महत्या करतं? आणखी एक सुशांत सिंग राजपूत? काय होतंय कळत नाही. ती फक्त 20 वर्षांची होती, असं म्हणतं तिने तुनिषाच्या मृत्यूवर हळहळ आणि संशयही व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनाही या प्रकरणात खुनाचाही संशय असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

लव्ह जिहादच्या अॅन्गल पोलिसांनी फेटाळला :

तुनिषाच्या मृत्यूला लव्ह जिहादचा कोणताच अँगल नाही, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. एसीपी चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, आरोपीची अद्याप चौकशी झालेली नाही. पुढील तपासात कुटुंबातील सर्व सदस्य आणि तज्ज्ञांचीही चौकशी केली जाईल. सेटवर काम करणाऱ्या लोकांकडूनही चौकशी केली जाणार आहे. सर्वांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. उर्वरित तपास यावर अवलंबून असेल. तुनिषाचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे सध्या स्पष्ट झाले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT