Badlapur News: '2000 रुपये आमच्याकडून घ्या, तुमची लाडकी बहीण योजना नको...' शिंदे सरकारवर बदलापूरकर संतापले!

मिथिलेश गुप्ता

Badlapur Thane School case: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक महिलांनी शिंदे सरकारवर तुफान टीका केली. महिलांच्या सुरक्षेसाठी योजना आणा असं म्हणत महिलांनी सरकारला धारेवर धरलं

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Badlapur Thane School case Update: बदलापूर: बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयातील चार वर्षांच्या चिमुकलीवर करण्यात आलेला लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईसाठी केलेली दिरंगाई यामुळे बदलापूरकरांच्या संतापाचा आज (20 ऑगस्ट) अक्षरश: उद्रेक झाला. यावेळी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून हजारो नागरिकांनी तब्बल 9 तास मध्य रेल्वे रोखून धरली. यावेळी आंदोलक हे शिंदे सरकारवर प्रचंड संतापलेले दिसून आले. (take 2000 rupees from us dont want mazi ladki bahin yojana women of badlapur are furious and very angry with the shinde government)

'आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको तर आमच्याकडून 2000 रुपये घ्या आणि आमच्या सुरक्षेसाठी एखादी योजना आणा.' असं म्हणत आंदोलक महिलांनी शिंदे सरकारच्या कारभारावर टीका केली. 

'आमच्याकडून 2 हजार रुपये घ्या आणि आमची सुरक्षा करण्यासाठी काहीतरी योजना काढा'

बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुंबई Tak च्या प्रतिनधीने जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी शिंदे सरकारविरोधात अत्यंत आक्रमक अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या. 'आमची मागणी ही आहे की.. आमच्या हातात आरोपीला सोपवा.. आम्ही बघू त्याचं काय करायचं ते.. मुख्यमंत्री अजून का आले नाही? जर एखादं उद्घाटन असेल तर ते रिबीन कापायला येतात. आता ही बलात्काराची घटना झालीए तर मुख्यमंत्री कुठे आहेत? एकनाथ शिंदे साहेब कुठे आहेत? आता जर उद्घाटन असतं तर... आता कुठे आहेत?'

हे ही वाचा>> Badlapur News: आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण अन् बरंच काही...; पोलिसांनी संतप्त जमावावर केला लाठीचार्ज

'जेव्हा तक्रार नोंदविण्यासाठी गेले तेव्हा तक्रार का घेतली नाही. महिला पोलीस अधिकारी तिथे होते.. तरी तक्रार का घेतली नाही? 12 तास का लावले त्यांना? आणखी एक घटना होण्याची वाट पाहत होते का? महिला या अजिबात सुरक्षित नाहीत.' 

    follow whatsapp