Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीला होणार अटक…, नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

zareen khan arrest warrant against case filed in kolkata court charges fraud bollywood actress
zareen khan arrest warrant against case filed in kolkata court charges fraud bollywood actress
social share
google news

Zareen Khan: बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानबाबत (Zareen Khan) धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या अभिनेत्रीविरोधात अटक वॉरंट (Arrest warrant) जारी करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, झरीनविरुद्ध कोलकात्याच्या सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, झरीनने जामिनासाठी अर्ज केला नसून ती अजून न्यायालयातही हजर राहिली नाही. ती न्यायालयाच्या नियमाप्रमाणे सतत हजर न राहिल्यामुळे तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.(zareen khan arrest warrant against actress case filed in kolkata court charges fraud)

फसवणुकीचा गुन्हा दाखल

फसवणूक केल्या प्रकरणी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 2016 मध्ये झरीनविरुद्ध कोलकाता येथील नरकेलडांगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता तिच्या विरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Mumbai-Goa Highway : ‘चमकोमॅन’ वर भरोसा ठेवणार का..?, मनसेने भाजप नेत्याला डिवचले

विश्वासघात केल्याचा ठपका

झरीन खान विरोधात अटक वॉरंट काढल्या आहे कारण, 2016 मध्ये झरीनन खान कोलकाता येथे एका कार्यक्रमासाठी येणार होती. मात्र या कार्यक्रमाला ती येऊ शकली नाही. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करुनही ती येऊ शकली नसल्याने तिच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका टेवण्यात आला होता. त्यानंतर मात्र कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिच्यावर कोलकाता येथील नरकेलडांगा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रश्नोत्तरांसाठी तपास

झरीन आणि तिच्या मॅनेजर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोघांनाही 41A प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे दोघांनाही या प्रकरणासंदर्भात प्रश्नोत्तरांसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागले होते.

हे ही वाचा >> Mohammed Siraj Record : मोहम्मद सिराजने रचला इतिहास, एकाच सामन्यात मोडले ‘हे’ रेकॉर्ड

आयोजकांविरुद्धही खटला

झरीन खानने आपली बाजू मांडताना सांगितले होते की, तिच्या आणि आयोजकांमध्ये विमान तिकीट आणि राहण्याच्या व्यवस्थेवरून वाद झाला होता. या वादानंतर तिने यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. झरीनने स्थानिक न्यायालयात त्याच आयोजकांविरुद्ध खटलाही दाखल केला आहे. मात्र, त्यावेळी झरीनकडे या प्रकरणाची कागदपत्रे नव्हती. नंतर या प्रकरणाचा तपास केला असता झरीन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कोलकाता येथील सियालदह न्यायालयात या अभिनेत्रीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT