Baramati Lok Sabha: मतदान सुरू असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, नवा डाव काय?
Supriya Sule has reached Ajit Pawar's House: बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत सुरू असताना ऐन मतदानाच्या वेळी सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी पोहचल्या आहे. पाहा नेमकं काय घडतंय बारामतीत.
ADVERTISEMENT
Supriya Sule: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यात आज बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या मतदारसंघाकडे अवघ्या देशाकडे लक्ष लागून राहिलं आहे. कारण इथे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना सुरू आहे. अशातच आज (7 मे) अचानक म्हणजे ऐन मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या बारामतीतील घरी पोहचल्या. त्यामुळे सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. (lok sabha election 2024 baramati lok sabha supriya sule reached ajit pawar house while voting was going on what is the new move)
ADVERTISEMENT
निवडणूक सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी आल्या. सुरुवातीला त्या नेमक्या कशासाठी आल्या आहेत याबाबत संभ्रम होता. मात्र, स्वत: सुप्रिया सुळेंनी बाहेर येत त्या नेमक्या अजित पवारांच्या घरी का आल्या होत्या याविषयी माहिती दिली.
सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या बंगल्यात अवघ्या 10 मिनिटेच थांबल्या. दहा मिनिटातच त्या बाहेर आल्या आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाहा त्यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या.
हे वाचलं का?
अजित पवारांच्या घरातून बाहेर पडल्यावर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे: आशाकाकींना नमस्कार करायला आणि भेटायला मी आले होते. एका सशक्त लोकशाहीमध्ये मतदान हे खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशाकाकी या त्यांची जबाबदारी म्हणून मतदानाला आल्या. मला आनंद वाटला की, काकी आवर्जून मतदानाला आल्या.
हे आमचं नेहमीचं आहे रूटीन.. काकीचा आशीर्वाद घेण्यासाठी आली होती. मघाशी सुमती काकी भेटल्या मला. प्रताप काका आले होते.. घरातले जे वरिष्ठ आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमीच घेते मी.
ADVERTISEMENT
घरात मी फक्त काकी आणि मीच.. दोघीच भेटलो आम्ही. काकींनाच भेटायला आले होते मी.. काकींना भेटले आणि निघाले.
प्रश्न: अचानक तुम्ही अजितदादांच्या घरी आल्या..
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे: हे माझ्या काकीचं घर आहे.. हे माझ्या काका-काकींचं घर आहे.
माझ्या काकीचे मलिदाचे लाडू.. चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात. माझं सगळं लहानपण.. माझ्या आयुष्यातील प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात दोन महिने राहायची.. आशा काकींकडे. त्या काळात फोन वैगरे फार नसायचे. तेव्हा माझी आईना माझ्याशी दोन-दोन महिने बोलायची नाही. जेवढं माझ्या आईने माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकीने माझं केलंय.. असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आणि त्या तिथून निघाल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT