Lok Sabha Election 2024: अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर!
लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

point

महाराष्ट्रात कधी होणार मतदान?

point

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं!

Lok Sabha Election Schedule: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (16 मार्च) पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 रोजी संपणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाला संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाडावी लागेल. अठराव्या लोकसभेसाठी देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर या मतमोजणी म्हणजेच लोकसभेचा निकाल हा 4 जून 2023 रोजी लागणार आहे. यावेळी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे. (lok sabha election 2024 date announcement by the central election commission announcement full coverage live coverage)

ADVERTISEMENT

पहिला टप्पा 20 मार्च अधिसूचना निघणार आणि 30 मार्चला अर्ज मागे घेता येणार. तर19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. 

महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक, पाहा कोणत्या तारखेला कोणता टप्पा..

ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आजवर लोकसभेसाठी महाराष्ट्रात कधीही न झालेली लढाई पाहायला मिळणार आहे. वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे  आणि महाराष्ट्रातील शेवटचा आणि पाचवा टप्पा हा 20 मे रोजी असणार आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कधी होणार मतदान?

1. पहिला टप्पा - 19 एप्रिल: रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान घेण्यात येईल.

2. दुसरा टप्पा - 26 एप्रिल: बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल

ADVERTISEMENT

3. तिसरा टप्पा - 7 मे: रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होईल.

ADVERTISEMENT

4. चौथा टप्पा - 13 मे: नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात येईल.

5. पाचवा टप्पा (महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा) - 20 मे: धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, ईशान्य मुंबई -(उत्तर-पूर्व), उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई येथे मतदान होईल आणि त्यासोबतच लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.

देशात 7 टप्प्यात निवडणूक होणार 

  1. पहिल्या टप्प्यात ईशान्य भारत, तमिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर येथे मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे.
  2. दुसरा टप्प्यातील मतदान हे 26 एप्रिलला होणार आहे.
  3. तिसरा टप्प्यात हे 7 मे रोजी मतदान पार पडेल. 
  4. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान घेतलं जाईल. 
  5. पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्राचं मतदान पूर्ण होणार आहे.
  6. सहाव्या टप्प्यामध्ये 25 मे रोजी मतदान घेतलं जाईल. 
  7. लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि सातवा टप्पा हा जून महिन्यात असणार आहे. ज्यामध्ये 1 जून रोजी मतदान होईल.

निकालाचा दिवस

यानंतर अवघ्या देशाचं लक्ष ज्या तारखकडे लागलेलं असेल ती मतमोजणीची तारीख 4 जून 2024 ही आहे. याच दिवशी चित्र स्पष्ट होईल की, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की नाही. सतराव्या लोकसभेचा कालावधी हा 16 जून 2024 संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे मुख्य आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल हा 4 जून 2024 (मंगळवार) रोजी जाहीर केला जाईल. या दिवशी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.

निवडणुकीच्या घोषणेसोबतच आता देशात आचारसंहिता देखील लागू झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत जो कोणी आचारसंहितेचा भंग करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

निवडणूक आयुक्तांची महत्त्वाची टिप्पणी 

देशात एकूण 96.8 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष तर 47.1 कोटी महिला मतदार आहेत. पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठीही घरोघरी मतदानाची सोय. 85 वर्षांवरील व्यक्तीच्या घरी जाऊन मतदान घेणार. अशी महत्त्वाची घोषणाही राजीव कुमार यांनी यावेळी केली आहे.

दारू, साड्या, पैसे आणि तत्सम वस्तू वाटणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार. तसंच सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. असा इशाराच निवडणूक आयुक्तांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्रासह देशात विधानसभांच्या एकून 26 पोटनिवडणुका व्हायच्या आहेत. आजवरच्या ज्या पोटनिवडणुका व्हायच्या बाकी आहेत त्या आता पूर्ण होतील. लोकसभेसोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुका होतील. असंही निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं.

 

पाहा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद LIVE:

 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT