लाइव्ह

Lok Sabha election Live : "...म्हणून मी मशाल हातात घेणार नाही", ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच राजू शेट्टी सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha election 2024 Maharashtra Latest Update : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील प्रचाराचा पारा चढू लागला आहे. दुसरीकडे अजूनही लोकसभेच्या जागावाटपाचा घोळ सुटलेला नाही. या संदर्भातील सर्व माहिती आणि घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी... (Maharashtra Politics Live News)

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 06:05 PM • 03 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : "...म्हणून मी मशाल हातात घेणार नाही", ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच राजू शेट्टी सोडलं मौन

    उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदासंघातून उमेदवार घोषित केला. त्यामुळे आता तिरंगी लढत या मतदरासंघात होणार आहे. ठाकरेंसोबत दोन वेळा बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा फिस्कटली. यावर राजू शेट्टी यांनी भूमिका मांडली. 

    राजू शेट्टींची भूमिका काय?

    1) "गेल्या 30 वर्षांपासून मी शेतकरी चळवळीत आहे. आयुष्यात कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम केलेलं नाही. मी शेतकरी चळवळ म्हणून पुढे नेत आहे; आता मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी मशाल हातात घेणार नाही. या निवडणुकीला मी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या जोरावर एकटाच सामोरे जात आहे."

    2) "एफआरपीमध्ये तीन तुकडे केल्यानंतर आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरवल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली. या धोरणात्मक बाबीला विरोध करून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या कार्यकारिणीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अधीन राहून स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आमची तीन वर्षांपासून सुरू होती."

    3) "मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीतील मत विभाजनामुळं महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला होता. हे मत विभाजन आम्ही टाळण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा; असा विचार राज्य कार्यकारिणीच्या समितीत झाला. त्यावरूनच मी गेल्या काही दिवसात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली."

    4) "लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार? हे देखील मी त्यांच्यासमोर मांडली. मात्र त्यापूर्वी मविआचे नेते हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानीला सोडणार असल्याचे जाहीर करत होते; त्यामुळे मी ठाकरे यांची भेट घेतली होती."

  • 03:39 PM • 03 Apr 2024

    संजय निरूपमांची काँग्रेसमधून हकालपट्टी

    काँग्रेस नेते संजय निरूपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत संजय निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकण्याचा आणि काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसने मंजूर केलेला प्रस्तावावर आता दिल्लीतील काँग्रेस हायकमांड निर्णय घेतील. 
     

  • 01:40 PM • 03 Apr 2024

    ठाकरेंकडून 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींविरोधात उमेदवार

    उद्धव ठाकरे यांनी 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 

    कल्याण- डोंबिवली वैशाली दरेकर 
    पालघर  भारती कामडी
    जळगाव : करण पवार 
    हातकणंगले : सत्यजित पाटील 
     

  • 01:32 PM • 03 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाने जाहीर केली नव्या 4 उमेदवारांची यादी!

    'धक्का खाणारी शिवसेना नाही, शिवसेना जोरात धक्का देते. राजकारणात बदल गरजेचा असतो. देश हुकूमशाहीच्या दिशेनं जात आहे. आमच्या पक्षात जे झालं ती गद्दारी होती. बंड कशाला म्हणतात हे उन्मेष पाटलांनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांची कल्याण मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच, हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, जळगावातून करण पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघरमधून भारती कांबळी लढणार आहेत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नव्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 12:47 PM • 03 Apr 2024

    Shiv Sena UBT : खासदारकीचा राजीनामा देत उन्मेष पाटील ठाकरेंच्या सेनेत

    भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मातोश्री येथे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

  • 12:43 PM • 03 Apr 2024

    Maharashtra Politics : 'शरद पवारांच्या निर्णयाची प्रतिक्षा', ज्योती मेटेंनी सांगितलं भेटीचं कारण

    दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. ज्योती मेटे या लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे. त्यातच आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी भूमिका मांडली.

    "मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रीय व्हायचं ठरवल्यानंतर या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडून आम्हाला निर्णयाची प्रतिक्षा आहे. राजकारणातील प्रवेशाच्या अनुषंगाने चर्चा झाली आहे. आज आम्ही जी काही पक्षाची भूमिका मांडली आहे, त्यावरच निर्णय होणार आहे. आज तरी माझा प्रवेश नसणार आहे. अंतिम निर्णय लवकरच होईल", अशी माहिती ज्योती मेटे यांनी दिली. 

  • ADVERTISEMENT

  • 10:55 AM • 03 Apr 2024

    Lok Sabha Election : जळगावमधून शिवसेनेचा खासदार जिंकून येईल -राऊत

    माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "भारतीय जनता पक्षाचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्याबरोबर जे त्यांचे अनेक सहकारी करण पवार आणि इतर काही कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकारी, जे उन्मेष पाटील यांचे सहकारी आहेत ते मोठ्या संख्येने आज मातोश्रीवर बारा वाजता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना परिवारात प्रवेश करत आहेत."

    "त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव लोकसभा अधिक रंगतदार होईल आणि शिवसेनेला विजयाच्या दिशेने हमखास घेऊन जाणारा हा पक्षप्रवेश आहे." 

    "जळगावमधून उमेदवार जाहीर केला नाही, पण शिवसेना पक्षप्रमुख आज उद्या लवकरच जाहीर करतील आणि ते तुम्हाला कळेल. जळगावात निवडणूक कोण लढत आहे; पण उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने जळगावची शिवसेना ही मजबुतीने पुढे जाईल. त्यांची ताकद शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावातून प्रथमच शिवसेनेचा खासदार लोकसभेला निवडून येईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही", असा दावा राऊत यांनी केला.

  • 09:27 AM • 03 Apr 2024

    Lok Sabha election 2024 : सांगलीसाठी विश्वजित कदमांनी काँग्रेसविरोधात उपसले 'बहिष्कार' शस्त्र

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित केल्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार विश्चजित कदम यांनी आपली नाराजी काँग्रेसकडे बोलून दावखली असून, आता त्यांनी बहिष्काराचे शस्त्र उपसले आहे. 

    आमदार विश्चजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी सांगलीच्या जागेचा आग्रह व्यक्त केला आहे. 

    सांगलीच्या जागेवबद्दल आमच्या भावना काय आहेत, हे तुम्ही जाणता. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत आपण पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे विश्वजित कदमांनी म्हटले आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमधील पेच वाढला आहे. 

  • 09:15 AM • 03 Apr 2024

    उदयन राजे भोसले महायुतीच्या बैठकीतून उठून का गेले?

    महायुतीच्या मतदारसंघनिहाय बैठका सुरू आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातही घटक पक्षांची बैठक मंगळवारी (2 मार्च) बोलवण्यात आली होती. 

    पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह काही जण उपस्थित होते. पण, अनेक नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. 

    पदाधिकाऱ्यांना बैठकीला येण्यास उशीर झाल्याने छत्रपती उदयन राजे भोसले हे निघून गेले. तर अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील हेही या बैठकीला गैरहजर होते.

follow whatsapp

ADVERTISEMENT