Lok Sabha Election 2024: महायुती वि. मविआ... तुमच्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार, पाहा संपूर्ण यादी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

तुमच्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार, पाहा संपूर्ण यादी!
तुमच्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार, पाहा संपूर्ण यादी!
social share
google news

Lok Sabha Election 2024 full Candidate List: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्ष आपआपले उमेदवार जाहीर करत आहेत. मात्र, या निवडणुकीत सर्वांचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलं आहे. कारण इथे युती आणि आघाडी अशा पद्धतीने निवडणूक लढवत आहेत. भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याने जागा वाटपाचा तिढा कायम आहे. पण आतापर्यंत ज्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. सर्वात आधी आपण  हे पाहूयात की, कोणता पक्ष किती जागा लढवत आहे. (lok sabha election 2024 mahayuti vs mva who is the candidate in your constituency see the complete list)

महाराष्टात महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवत आहे. 

  • भाजप - 24 जागा
  • शिवसेना (शिंदे गट) - 8 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 4 जागा 

महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिवसेना (ठाकरे गट) लढवत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • काँग्रेस - 13 जागा
  • शिवसेना (ठाकरे गट) - 17 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) - 5 जागा

वंचित बहुजन आघाडी - 19 जागा 

महाविकास आघाडी आणि महायुतीत यांच्यात अद्यापही काही जागांवरील तिढा हा कायम आहे. त्यामुळे नेमक्या किती जागा कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, येत्या काही दिवसातच याबाबतचं नेमकं चित्र स्पष्ट होईल.

ADVERTISEMENT

कोणत्या पक्षाने कोणत्या मतदारसंघात आपले उमेदवार दिले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

भाजपने 'या' 24 जागांवर जाहीर केले उमेदवार 

  1. नंदूरबार (ST राखीव) - हिना गावित
  2. धुळे - सुभाष भामरे
  3. जळगाव - स्मिता वाघ
  4. रावेर - रक्ष खडसे
  5. अकोला - अनुप धोत्रे
  6. वर्धा - रामदास तडस
  7. नागपूर - नितीन गडकरी
  8. चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
  9. नांदेड - प्रतापराव पाटील-चिखलीकर
  10. जालना - रावसाहेब दानवे
  11. दिंडोरी (ST राखीव) - भारती पवार
  12. भिवंडी - कपिल पाटील
  13. पुणे - मुरलीधर मोहोळ
  14. अहमदनगर - सुजय विखे
  15. बीड - पंकजा मुंडे
  16. लातूर (SC राखीव) - सुधाकर श्रृंगारे 
  17. माढा - रणतीतसिंह नाईक-निंबाळकर
  18. सांगली - संजयकाका पाटील
  19. अमरावती (SC राखीव) - नवनीत राणा
  20. सोलापूर (SC राखीव) - राम सातपुते
  21. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे
  22. गडचिरोली - अशोक नेते
  23. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) - मिहीर कोटेचा
  24. मुंबई उत्तर - पियूष गोयल

भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचं ध्येय ठेवलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही भाजप अत्यंत आक्रमक पद्धतीने निवडणूक लढवत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत भाजपने 24 उमेदवार जाहीर केले आहे. मात्र, यापुढेही काही उमेदवार भाजपकडून जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप तब्बल 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे.  

शिवसेनेने (शिंदे गट) 'या' 8 जागांवर जाहीर केलेत उमेदवार 

  1. कोल्हापूर - संजय मंडलिक
  2. रामटेक - राजू पारवे
  3. बुलढाणा - प्रतापराव जाधव
  4. मावळ - श्रीरंग बारणे
  5. हिंगोली - हेमंत पाटील
  6. शिर्डी - सदाशिव लोखंडे
  7. मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
  8. हातकणंगले - धैर्यशील माने

महायुतीत सर्वाधिक फटका हा शिवसेना (शिंदे गट) यांना बसला आहे. कारण 2019 साली शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. मात्र, आता महायुतीत त्यांच्या वाटेला अत्यंत कमी जागा आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 'या' 4 जागांवर लढणार

  1. बारामती - सुनेत्रा पवार 
  2. रायगड - सुनील तटकरे 
  3. शिरूर - शिवाजीराव आढळराव-पाटील 
  4. परभणी - महादेव जानकर (NCP कोट्यातून)

शिंदे गटा प्रमाणेच अजित पवार गटाला देखील कमी जागांवर समाधान मानावं लागणार आहे. त्यामुळे महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसने 'या' 13 जागांवर जाहीर केले उमेदवार

  1. नंदूरबार (ST राखीव) - गोवाल पाडवी 
  2. अकोला - अभय पाटील 
  3. नागपूर - विकास ठाकरे
  4. चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर
  5. नांदेड - वसंतराव चव्हाण
  6. पुणे - रवींद्र धंगेकर
  7. लातूर (SC राखीव) - शिवाजीराव कलगे
  8. अमरावती (SC राखीव) - बळवंत वानखेडे 
  9. सोलापूर (SC राखीव) - प्रणिती शिंदे
  10. कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
  11. रामटेक - श्यामकुमार बर्वे
  12. भंडारा-गोंदिया - प्रशांत पडोळे
  13. गडचिरोली - नामदेव किरसान

महाविकास आघाडीत देखील जागा वाटपाचा तिढा हा कायम आहे. मात्र, असं असलं तरी शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने आपले बऱ्यापैकी उमेदवार जाहीर केले आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्रात एकच जागा जिंकलेल्या काँग्रेसचा यंदाच्या निवडणुकी उत्साह दुणावलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी 13 उमेदवारांची घोषणा केली आहे.

'या' 17 जागांवर लढणार ठाकरेंच्या शिवसेनेचे  उमेदवार 

  1. सांगली - चंद्रहार पाटील
  2. रायगड - अनंत गीते
  3. बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
  4. यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
  5. मावळ - संजय वाघेरे-पाटील
  6. हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
  7. छ. संभाजीनगर (औरंगाबाद) - चंद्रकांत खैरे
  8. धाराशिव (उस्मानाबाद) - ओमराजे निंबाळकर
  9. शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे
  10. नाशिक - राजाभाऊ वाजे
  11. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
  12. ठाणे -राजन विचारे
  13. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) - संजय दिना पाटील
  14. मुंबई दक्षिण -अरविंद सावंत
  15. मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) - अमोल कीर्तिकर
  16. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
  17. परभणी - संजय जाधव

महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) हा सर्वाधिक म्हणजे 22 जागा लढवणार आहे. त्यापैकी 17 जागा त्यांनी आधीच जाहीर केल्या आहेत. फक्त काही जागांवरील उमेदवार निश्चित होत नसल्याने तेथील घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) 'या' 5 जागांवर लढणार

  1. वर्धा - अमर काळे
  2. दिंडोरी (ST राखीव) - भास्कर भगरे
  3. अहमदनगर - निलेश लंके
  4. बारामती - सुप्रिया सुळे
  5. शिरूर - अमोल कोल्हे

अजित पवार गटाप्रमाणेच शरद पवार गटाला देखील कमीच जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाने आतापर्यंत केवळ पाचच उमेदवार जाहीर केले आहेत.

वंचित बहुजन आघाडी पक्ष लढणार 'या' 19 जागा 

  1. धुळे - अब्दुर रहमान 
  2. रावेर - संजय ब्राम्हणे 
  3. अकोला - प्रकाश आंबेडकर
  4. वर्धा -  प्रा. राजेंद्र साळुंके
  5. चंद्रपूर - राजेश वारलुजी बेरे
  6. जालना - प्रभाकर बाकले
  7. लातूर (SC राखीव) - नरसिंह राव उदगीरकर
  8. माढा - रमेश बारस्कर
  9. अमरावती (SC राखीव) - कु. प्राजक्ता पिल्लेवाण 
  10. सोलापूर (SC राखीव) - राहुल गायकवाड
  11. भंडारा-गोंदिया - संजय गजानन केवट
  12. गडचिरोली - हितेश पांडुरंग मडावी
  13. बुलढाणा - वसंत राजाराम मगर
  14. यवतमाळ-वाशिम -खेमसिंग प्रतापराव पवार
  15. हिंगोली - डॉ. बी. डी चव्हाण
  16. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - काका जोशी
  17. मुंबई उत्तर-मध्य - अबुल हसन खान 
  18. हातकणंगले - दादासाहेब चौगडा पाटील
  19. सातारा - मारूती जानकर

महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत वंचित बहुजन आघाडी देखील बरीच चर्चेत आहे. वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश व्हावा यासाठी बरेच प्रयत्न सुरू होते. मात्र, जागा वाटप योग्य पद्धतीने होऊ न शकल्याने वंचितने एकला चलो रेची भूमिका घेतली. त्यानंतर वंचितने आतापर्यंत 19 जागांवरचे उमेदवार जाहीर देखील केले आहेत. ज्यापैकी कोल्हापूर, सांगली आणि नागपूर येथे उमेदवार न देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT