लाइव्ह

Maharashtra Lok Sabha 2024 Live : ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manifesto of Uddhav Thackeray's Shiv Sena announced
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा जाहीर
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 26एप्रिल रोजी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदासंघाचा समावेश आहे. 

ADVERTISEMENT

आठ मतदारसंघातील प्रचार थांबला असला, तरी इतर मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. रणरणत्या उन्हात प्रचार सुरू आहे. दुसरीकडे बेरजेचं राजकारणाचेही प्रयत्नही होत आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षणाक्षणाला घडामोडी घडत असून, सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह न्यूज

ADVERTISEMENT

  • 09:03 AM • 26 Apr 2024

    नांदेडमधल्या पाळज येथील मतदान केंद्रावर काही मिनिटांचा गोंधळ

    निवडणूक आयोगाचे झोनल अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित.

    एव्हीएममध्ये तांत्रिक अडचण येत असल्याची मतदारांच्या तक्रारीनंतर हालचाली. 

    सध्या मशीन तपासले जात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.

  • 08:34 AM • 26 Apr 2024

    राजश्री पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

    शिवसेना उमेदवार राजश्री पाटील मतदानाचा हक्का बजावला. यवतामाळ-वाशिममध्ये राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

  • 06:52 PM • 25 Apr 2024

    ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर

    • वित्तीय केंद्र महाराष्ट्रात उभारू, जेणेकरून रोजगारांच्या सध्या उपलब्ध होतील. 
    • प्रत्येक जिल्हा रूग्णालय़ात अत्याधुनिक उपकरणे आणू 
    • संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्यात येईल 
    • शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त करणार नाही, तर पीकविम्याचे निकष कंपन्यांनी ठरवले असतात. हे निकष बदलले जाईल. 
    • शेती उपयुक्त गोष्टीवर सध्या जीएसटी लागतो आहे. त्या वस्तु जीएसटी मुक्त करू. 
    • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे हमीभाव देऊ.
    • शेतकऱ्यांना गोदामे बांधुन देऊ, त्यांना शीतगृह उपलब्ध करून देऊ, जेणेकरून शेतकऱ्याला माल तिकडे ठेवता येईल आणि जेव्हा गरज असेल तेव्हा बाजारात नेता येईल. 
    • कृषी खात्यात सर्वे करणारे केंद्र स्थापण करायचे.
    • पर्यावरणस्नेही उद्योग महाराष्ट्रात आणू...बारसू, नाणार, जैतापूर सारखे विनाशकारी प्रकल्प राज्यात येऊ देणार नाही. 
    • सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी ठेऊ. 
    • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ.
       
  • 04:19 PM • 25 Apr 2024

    मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार हल्ला

    संविधान बदलणार हा खोटा प्रचार आहे.  सुर्य आणि चंद्र असे पर्यंत बाबा साहेबांच संविधान बदलणार नाही. बाबासाहेबांचा संविधान दिन यांना 50-60 वर्ष साजरा करता आला नाही. पण मोदींनी 2015 पासून संविधान दिन साजरा करायला सुरूवात केली. विरोधकांच्या या आरोपावर नागरीकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. 

    महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या कमी सभा होतायत, यावर बोलताना शिंदे म्हणाले, निवडणुकीत आम्ही काय घरात बसायचं. यांच्या सारखं घरात बसून फेसबूक लाईव्ह करू, आम्ही फिल्डवर उतरणारे कार्यकर्ते अशी टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली. राहुल गांधींना थोड गरम झालं की ते जातात परदेशात थंडगार हवा खायला. पण जे घरी बसणारे आहेत त्यांना या निवडणूकीत लोकं घरी बसवतील, असे देखील शिंदे म्हणाले आहेत. नाशिक आणि ठाण्याची जागाही शिवसेना लढवणार असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले. 

    मोदी खोटारडे असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पवार साहेबांनी जी वक्तव्य केली आहेत, ती वक्तव्ये बाहेर येतील ना, खरं काय आणि खोट काय समोर येणारच आहे. मोदींना खोट बोलण्याची गरजच नाही. त्यांनी जो वचननामा दिला आहे, तो पुर्ण केलाय, आता फक्त मोदी गँरंटी चालते बाकी गॅरंटी फेल आहे, असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला. 

  • ADVERTISEMENT

  • 02:01 PM • 25 Apr 2024

    'भाजपचा कारभार पाहून बाबासाहेब आंबेडकरांना पण...', विश्वजित कदमांचा हल्लाबोल

    'सांगली जिल्ह्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या विचारला बळ दिले असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी काँग्रेसचा विचार लक्षात घेऊन लढ्यात सहभागी झाले. राजारामबापूचे देखील जिल्ह्याच्या विकासात योगदान आहे, असे आमदार विश्वजित कदम यांनी भाषणात सांगितले. भाजपने पहिल्यांदा सत्तेवर येताना जनतेला फसवलं आणि तात्पुरता स्वार्थ साधून घेतला. 2014 ते 19 मध्ये अनेक बाबतीत जनतेची फसवणूक झाली. मागील 5 वर्षात तर अनेक कटकारस्थान सत्ताधारी मंडळीकडून करण्यात आलीत. यंत्रणाचा वापर करून लोकशाहीला घातक करण्याचे काम केले जातेय, असा आरोपही त्यांनी केला. ज्या पद्धतीनं भाजपाचा कारभार सुरू आहे, ते पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाईट वाटत असेल,' असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. 

  • 01:32 PM • 25 Apr 2024

    'सांगलीनं काँग्रेसच्या विचारांना बळ दिलं', मेळाव्यात विश्वजीत कदमांचं भाषण सुरू!

    'सांगली आणि काँग्रेसचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. सांगली जिल्ह्याची ही भूमी स्वातंत्र्य सैनिकांची लढावी अशी भूमी आहे. क्रांतीसिंह नाना पाटील असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचीही जन्मभूमी आहे. सांगलीनं काँग्रेसच्या विचारांना बळ दिलं. सांगलीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ज्येष्ठ नेत्यांचा आदर आहे. 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपचं सरकार आलं. पण भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली.' अशा शब्दात विश्वजीत कदम यांनी भाजपवर निशाणा साधला.


     

  • ADVERTISEMENT

  • 12:49 PM • 25 Apr 2024

    Lok Sabha Election Updates : आंबेडकरांच्या मनात काय, सगळंच गणित फिरणार?

    वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत ३५ मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अफसर खान यांचं नाव जाहीर केलं, पण त्यांना एबी फॉर्मच देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर भूमिकाही मांडलेली नाही. त्यांच्या भूमिकेमुळे सस्पेन्स निर्माण झाला असून, त्यावर या मतदारसंघातील बरीच गणितं अवलंबून आहेत. 

    गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळेच एमआयएमचे इम्तियाज जलील लोकसभेत पोहोचले होते. पण, यावेळी त्यांना पाठिंबा नाही.  या मतदारसंघात जातीय समीकरणे निर्णायक आहेत. त्यामुळेच महायुतीने विनोद पाटील यांना अपक्ष लढण्यापासून रोखले. पण, वंचितने उमेदवार जाहीर करूनही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे इतर मतदारसंघाप्रमाणे आंबेडकर उमेदवार बदलण्याच्या मानसिकतेत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

    वंचितच्या उमेदवारामुळे गेल्यावेळी युती आणि आघाडीच्या उमेदवाराला धोबीपछाड देत इम्तियाज जलील खासदार बनले. पण, यावेळी या मतदारसंघातील निवडणूक खूपच रंजक झाली आहे आणि त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर असदुद्दीन ओवैसींचंही लक्ष आंबेडकरांच्या भूमिकेकडे आहे.

  • 09:33 AM • 25 Apr 2024

    Maharashtra Lok Sabha Election : चंद्रहार पाटलांनी सोडलं मौन, विशाल पाटलांवर घणाघाती टीका

    सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला न सुटल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असून, याचा थेट फटका महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना बसेल, असे म्हटले जात आहे. पण, विशाल पाटलांच्या बंडखोरीवर मौन बाळगून असलेल्या चंद्रहार पाटलांनी घणाघाती टीका केली आहे. 

    "विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे. भाजपाकडून पाकीट घेऊन ते पाकीट या चिन्हावर उमेदवारी करत आहेत. विशाल पाटील यांनी बंडखोरी करुन चूक केली आहे. हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे", असे चंद्रहार पाटील म्हणाले. 

    "विशाल पाटील जर स्वतःला कुस्तीतील किंवा राजकारणातील पैलवान म्हणत असतील तर महाराष्ट्रातील सर्व पैलवानांना तालमी बंद करून घरी जावे लागेल. त्यांच्या समोर हा डबल महाराष्ट्र केसरी उभा आहे. आज ते भाषणाला जरी उभे राहिले तर त्यांना त्यांच्या आजोबांचे, वडिलांचे नाव घ्यावे लागते. कारण यांनी स्वतः काही काम केलेलेच नाही", असे चंद्रहार पाटील म्हणाले.

    "साखर कारखान्यावरून वसंतदादांचे नाव जाऊन एका कंपनीचे नाव लागले, तेव्हा लाज वाटली नाही का? असा सवालही शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार चंद्रहार पाटील यांनी यावेळी केला. 

  • 08:38 AM • 25 Apr 2024

    Raigad Lok Sabha Updates : पवारांना आणून आमची ताकद कळाली; तटकरेंचा पाटलांना टोला

    शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची झाली. या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टोला लगावला. 

    माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे झालेल्या सभेत सुनील तटकरे म्हणाले की, "जयंत पाटील, बरे झाले तुम्ही शरद पवारांना इथे आणले. राष्ट्रीय नेतृत्वाला एका छोट्याशा गावात आणल्याने आमची ताकद किती आहे, हे तुम्हाला मान्य करावे लागले", अशी टीका त्यांनी केली. 

    "माझ्या प्रचाराला मी राष्ट्रीय पातळीवरील नेता आणला नाही. माझी महायुती भक्कम आहे. पण, तुम्हाला शरद पवारांची आठवण आली", असा चिमटा तटकरेंनी जयंत पाटलांना काढला. 

  • 08:18 AM • 25 Apr 2024

    Shiv Sena UBT Updates : ठाकरेंच्या मशाल गीताचा आज फैसला

    शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभा निवडणुकीसाठी मशाल चिन्हाचे प्रचारगीत तयार केले आहे. पण, या गीतातील काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला हे शब्द वगळण्यास सांगण्यात आले. 

    'हिंदू' आणि 'जय भवानी' हे शब्द गाण्यातून काढून टाकण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. आम्ही धर्माच्या नावावर मते मागत नाही. भवानीमाता हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून, शब्द वगळणार नाही, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. 

    दरम्यान, यासंदर्भात आयोगाने पुनर्विचार करावा, अशी विनंती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आयोगाकडे केली आहे. ही विनंती मान्य करत यावर आज (२५ एप्रिल) निर्णय घेणार असल्याची माहिती सह मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली. 

  • 08:09 AM • 25 Apr 2024

    Baramati Lok Sabha Updates : सुप्रिया सुळेंना चिंता! बारामतीत दोन उमेदवारांना तुतारी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं गेलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला. मात्र, हा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. 

    "ट्रम्पेट या वाद्याचे तुतारी असे भाषांतर आयोगाच्या पुस्तकात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे", असा आक्षेप सुप्रिया सुळेंनी घेतला होता. 

    "ट्रम्पेट हे मुक्त चिन्ह आहे. त्याचे वाटप झालेले असून, आता यावर आक्षेप घेण्याची वेळ निघून गेली आहे. मतदान करताना ट्रम्पेट आणि तुतारी ही चिन्हे दिसतात, त्यांची नावे नाही. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याचा प्रश्न येत नाही. दोन्ही चिन्हांची तुलना होऊ शकत नाही", असे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी सांगितले.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT