Lok Sabha election 2024 Live updates : 'वंचित'ची तिसरी यादी जाहीर, वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी
Lok Sabha election 2024 Maharashtra Live news : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबद्दलचे अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती वाचा मुंबई तक लाईव्ह अपडेट्सवर
ADVERTISEMENT
Lok Sabha election 2024 Maharashtra Live News : यावेळची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही. या रस्सीखेचामुळे राजकीय घडामोडीही वाढल्या आहे... त्या सगळ्यांचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 01:34 PM • 03 Apr 2024
Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाने जाहीर केली नव्या 4 उमेदवारांची यादी!
'धक्का खाणारी शिवसेना नाही, शिवसेना जोरात धक्का देते. राजकारणात बदल गरजेचा असतो. देश हुकूमशाहीच्या दिशेनं जात आहे. आमच्या पक्षात जे झालं ती गद्दारी होती. बंड कशाला म्हणतात हे उन्मेष पाटलांनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांची कल्याण मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच, हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, जळगावातून करण पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामडी लढणार आहेत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नव्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
- 09:04 PM • 02 Apr 2024
'वंचित'ची तिसरी यादी जाहीर, वसंत मोरेंना पुण्यातून उमेदवारी
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. वंचितने बारामतीतून उमेदवारी देणे टाळली आहे. त्याऐवजी प्रकाश आंबेडकर शरद पवारांना बारामतीत पाठींबा देणार आहेत.
नांदेड - अविनाश बोसीकर -लिंगायत
परभणी-बाबासाहेब भुजंगराव उगले -मराठा
औरंगाबाद - अफसार खान- मुस्लिम
पुणे - वसंत मोरे - मराठा
शिरूर- मंगलदास बगूल- मराठा - 08:49 PM • 02 Apr 2024
शिंदेंच्या उमेदवारांसाठी मोदी येणार महाराष्ट्रात, तारीख ठरली!
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येणार आहे.रामटेक आणि चंद्रपुर या लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. यामधली पहिली सभा रामटेकमध्ये 10 एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसरी सभा चंद्रपुरमध्ये 14 एप्रिल रोजी होणार आ
- 03:27 PM • 02 Apr 2024
Lok Sabha election 2024 : नाशिकच्या जागेचा घोळ सुटणार?
- शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे वर्षा बंगल्यावर, 2 नंतर भेटण्याची वेळ.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरून मुंबईकडे रवाना.
- अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ तातडीने मुंबईकडे रवाना.
- शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे नियोजित यवतमाळ दौरा रद्द करून तातडीने मुंबईला रवाना.
- नाशिक जागेसाठी अजित पवार गट व शिंदे गट संयुक्त बैठक होण्याची शकता. - 03:05 PM • 02 Apr 2024
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंचा भाजपला मोठा झटका! विद्ममान खासदाराचा पक्षप्रवेश ठरला
जळगावचे भाजपचे विद्ममान खासदार उन्मेष पाटील हे भाजपला रामराम करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. उन्मेष पाटील यांनी आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, "उद्या दु. 12.30 ला जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश. ओरिजिनल शिवसेना परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत."
उन्मेष पाटील यांनी आधी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील यांना कॉल केल्याची माहिती आहे. त्यांनी पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला.
- 01:38 PM • 02 Apr 2024
Unmesh Patil News : भाजप खासदार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर
भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. उन्मेष पाटील यांनी आधी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते आता ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
उन्मेष पाटील यांच्या भेटीनंतर बोलताना खासदार संजय राऊत यांनी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. राऊत म्हणाले की, "उन्मेष पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे. उद्यापर्यंत जळगावची उमेदवारी कळेल."
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने २०१९ मध्ये उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली होती. यावेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले पाटील आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
- 12:44 PM • 02 Apr 2024
Lok Sabha Election 2024 : उन्मेष पाटलांनी घेतली संजय राऊतांची भेट, म्हणाले...
भाजपचे विद्ममान खासदार उन्मेष पाटील यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भेटीनंतर उन्मेष पाटील यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, "सगळ्या प्रश्नांवर मी सविस्तर बोलेन. आज बोलणे उचित नाहीये. मी माध्यमांशी मोकळा संवाद साधेल. मी आणि राऊत साहेबांनी संसदेत सोबत काम केलेलं आहे. आमची राऊत साहेबांशी चर्चा होत असते. त्यासाठी मी संवाद साधायला आलोय. राजकारणापलीकडे मैत्री जपली पाहिजे. तो जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही", असे उन्मेष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
- 10:25 AM • 02 Apr 2024
EVM हटवण्याची हिंमत दाखवावी संजय राऊतांचं आव्हान!
'EVM हटवण्याची आमची मागणी आहे. कुणालाही मत दिलं तरी ते कमळालाच जाणार आहे. लोकांचा निवडणुकांवर विश्वास राहणार नाही. ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. ते हटवण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तसंच, आम्ही आजही वंचितसोबत संवाद साधण्यास इच्छुक आहोत. कोणत्याही गद्दारासाठी आता दरवाजे उघडे नाहीत. एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट होणार.' असा थेट इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
- 10:13 AM • 02 Apr 2024
शिंदेंना बच्चू कडूंचंही टेन्शन; बावनकुळेंचं मोठं विधान
विद्ममान शिवसेना खासदारांची तिकिटं धोक्यात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यात आता बच्चू कडू यांचीही भर पडताना दिसत आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उतरवला आहे.
बच्चू कडू यांच्या या भूमिकेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट केले. बावनकुळे काय म्हणाले, वाचा...
"बच्चू कडू यांचा वेगळा पक्ष असून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. कडू हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युतीत आहेत. बच्चू कडूंची थेट भाजपशी नाही, तर शिंदेंबरोबर युती आहे. बच्चू कडूंचा तिढा शिंदे सोडवतील. कडूंनी नाही ऐकलं, तर मतदार ठरवतील ते होईल", अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
त्यामुळे शिवसेना खासदारांसोबतच एकनाथ शिंदे यांच्या टेन्शनमध्ये बच्चू कडू यांनी भर टाकली आहे. त्यामुळे शिंदे बच्चू कडूंचे मन परिवर्तन कसे करणार हे बघावं लागेल.
- 08:54 AM • 02 Apr 2024
Lok Sabha Election 2024 : शिवसेना उमेदवाराला भाजपचाच विरोध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवाराला भाजपमधून विरोध होत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदेंनी हेमंत पाटील यांना पुन्हा तिकीट दिले आहे, पण हिंगोली आणि नांदेडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून याला विरोध होत आहे. हेमंत पाटलांविरोधात महायुतीमध्येच नाराजी आहे.
यासंदर्भात भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता हिंगोलीतील उमेदवार बदलला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तिकीट जाण्याची भीती निर्माण झाल्यामुळे हेमंत गोडसेंच्या पाठोपाठ आता हेमंत पाटील यांचे समर्थकही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत.
- 08:10 AM • 02 Apr 2024
Nashik Lok Sabha election 2024 : गोडसेंची उडाली झोप, रात्रीतून गाठली मुंबई
शिवसेनेचे नाशिकचे विद्ममान खासदार हेमंत गोडसे हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचा वाढता विरोध आणि छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या घडामोडींनी हेमंत गोडसेंची झोप उडाली आहे.
आपल्या समर्थकांसह दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही. त्यातच सोमवारी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन रात्रीतूनच मुंबई गाठली.
हेमंत गोडसे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ११ वाजता भेट घेणार असल्याचे समजते. हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत. पण, छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
श्रीकांत शिंदेंनी केली होती घोषणा
काही दिवसांपासून नाशिकमध्ये जेव्हा शिवसेनेचा मेळावा झाला, त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना जिंकून आणायचे आहे, असे म्हणत त्यांची उमेदवारीच जाहीर केली होती. पण, दिल्लीतील नेतृत्वच महायुतीचे उमेदवार ठरवतील, असे प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले होते. त्याची आता प्रचिती येताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT