Modi Oath Ceremony Live : मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान, मंत्रिमंडळात कोण-कोण?
Narendra Modi's oath-taking ceremony LIVE News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार देशात स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाली, कुणाला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, याबद्दलचे सर्व अपडेट्स आणि शपथविधी सोहळा पाहा लाईव्ह...
ADVERTISEMENT
Narendra Modi's oath-taking ceremony LIVE Updates : लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. एनडीएतील मित्रपक्षांच्या वाटाघाटी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
ADVERTISEMENT
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. भाजपसह एनडीएतील घटकपक्षांच्या काही नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असून, त्यांचाही शपथविधी झाला आहे.
महाराष्ट्रातून कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्याबद्दलही महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे सर्व लाईव्ह अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
- 09:56 PM • 09 Jun 2024
PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात 'हे' झाले राज्यमंत्री
1) जितीन प्रसाद - राज्यमंत्री
2) श्रीपाद नाईक - राज्यमंत्री
3) पकंज चौधरी - राज्यमंत्री
4) श्रीकृष्ण पाल - राज्यमंत्री
5) रामदास आठवले - राज्यमंत्री
6) रामनाथ ठाकूर - राज्यमंत्री
7) नित्यानंद राय - राज्यमंत्री
8) अनुप्रिया पटेल - राज्यमंत्री
9) व्ही. सोमण्णा - राज्यमंत्री
10) चंद्रशेखर प्रेमासानी - राज्यमंत्री
11) एसपी सिंह बघेल - राज्यमंत्री
12) शोभा करंलाजे - राज्यमंत्री
13) कीर्तिवर्धन सिंह - राज्यमंत्री
14) बीएल वर्मा - राज्यमंत्री
15) शांतनू ठाकूर - राज्यमंत्री
16) सुरेश गोपी - राज्यमंत्री
17) एल मुरुगन - राज्यमंत्री
18) अजय टम्टा - राज्यमंत्री
19) बंडी संजय कुमार - राज्यमंत्री
20) कमलेश पासवान - राज्यमंत्री
21) भागीरथ चौधरी - राज्यमंत्री
22) सतीशचंद्र दुबे - राज्यमंत्री
23) संजय शेठ - राज्यमंत्री
24) रवनीत सिंग - राज्यमंत्री
25) दुर्गादास ऊईके - राज्यमंत्री
26) रक्षा खडसे - राज्यमंत्री
27) सुखांता मजुमदार - राज्यमंत्री
28) सावित्री ठाकूर - राज्यमंत्री
29) तोखन साहू - राज्यमंत्री
30) राज भूषण चौधरी - राज्यमंत्री
31) भूपती राजू श्रीनिवास वर्मा - राज्यमंत्री
32) हर्ष मल्होत्रा - राज्यमंत्री
33) निमुबेन बामनिया - राज्यमंत्री
34) मुरलीधर मोहोळ - राज्यमंत्री
35) जॉर्ज कुरिअन - राज्यमंत्री
36) पवित्र मार्गरिटा - राज्यमंत्री - 09:04 PM • 09 Jun 2024
Modi 3.0 : 'या' मंत्र्यांकडे असणार स्वतंंत्र कार्यभार
31) राव इंद्रजित सिंह - राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार
32) डॉ. जितेंद्र सिंह - राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार
33) अर्जून राम मेघवाल - राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार
34) प्रतापराव जाधव - राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार
35) जयंत चौधरी - राज्यमंत्री- स्वतंत्र प्रभार - 09:02 PM • 09 Jun 2024
Modi Cabinet 2024 : मोदींच्या सरकारमध्ये 30 जण कॅबिनेट मंत्री, संपूर्ण यादी
1) राजनाथ सिंह - कॅबिनेट मंत्री
2) अमित शाह - कॅबिनेट मंत्री
3) नितीन गडकरी - कॅबिनेट मंत्री
4) जगत प्रकाश नड्डा - कॅबिनेट मंत्री
5) शिवराज सिंह चौहान - कॅबिनेट मंत्री
6) निर्मला सीतारमन - कॅबिनेट मंत्री
7) एस. जयशंकर - कॅबिनेट मंत्री
8) मनोहरलाल खट्टर - कॅबिनेट मंत्री
9) एच.डी. कुमारस्वामी - कॅबिनेट मंत्री
10) पीयूष गोयल - कॅबिनेट मंत्री
11) धर्मेंद्र प्रधान - कॅबिनेट मंत्री
12) जीतनराम मांझी - कॅबिनेट मंत्री
13) राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह - कॅबिनेट मंत्री
14) सर्बानंद सोनोवाल - कॅबिनेट मंत्री
15) विरेंद्र कुमार - कॅबिनेट मंत्री
16) केजराप्पू रायमोहन नायडू - कॅबिनेट मंत्री
17) प्रल्हाद जोशी - कॅबिनेट मंत्री
18) ज्युएलो राम - कॅबिनेट मंत्री
19) गिरीराज सिंह - कॅबिनेट मंत्री
20) अश्विनी वैष्णव - कॅबिनेट मंत्री
21) ज्योतिरादित्य शिंदे - कॅबिनेट मंत्री
22) भूपेंद्र यादव - कॅबिनेट मंत्री
23) गजेंद्र सिंह शेखावत - कॅबिनेट मंत्री
24) अन्नपूर्णा देवी - कॅबिनेट मंत्री
25) किरण रिजूजू - कॅबिनेट मंत्री
26) हरदीप सिंग पुरी - कॅबिनेट मंत्री
27) मनसुख मांडविया - कॅबिनेट मंत्री
28) जी किशन रेड्डी - कॅबिनेट मंत्री
29) चिराग पासवान - कॅबिनेट मंत्री
30) सी.आर. पाटील - कॅबिनेट मंत्री - 07:47 PM • 09 Jun 2024
Modi Oath Live Updates : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान
नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.
मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन, एस. जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एच.डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
- 06:49 PM • 09 Jun 2024
Modi Oath Live Updates : मोदींचा शपथविधी सुरू, कुणी कुणी घेतली शपथ? पाहा लाईव्ह
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सुरू झाला आहे. संपूर्ण कार्यक्रम पाहा लाईव्ह
- 05:35 PM • 09 Jun 2024
Praful Patel on Modi Cabinet : राज्यमंत्रीपद घेणं मला योग्य वाटलं नाही -प्रफुल पटेल
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पद घेण्यास नकार दिला. याबद्दल पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली. वाचा पटेल काय म्हणाले...
"आम्हाला भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी पूर्वी कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेलो आहे. म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात भाजपच्या नेतृत्वाची काही चूक नाही."
"त्यांना (भाजप) अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन निर्णय करायचा असतो. आता महाराष्ट्रात शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले होते. त्यांना ज्या काही सूचना मिळाल्या, त्याच अनुषंगाने आम्हालाही सूचना देण्यात आली."
"हेही तितकंच खरं आहे की, आम्हाला सांगण्यात आलं की, तुम्ही थोडा धीर ठेवा. थोडे दिवस वाट बघा. त्यांनी इतर राज्यात कोणता निकष लावलेला आहे. कोणत्या राज्यात कोणत्या आधारावर कुठला निर्णय घेतलेला आहे. हे मी त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही."
- 01:04 PM • 09 Jun 2024
Modi Cabinet Updates : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही?
लोकसभा निवडणुकीत सात जागा जिंकलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोदींच्या मंत्रिमंडळात एक मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे.
सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांची बैठक झाली. या बैठकीनंतरही गूढ कायम आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत.
प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांना मंत्रिपद मिळू शकते, असे म्हटले जात होते. पण, दोन्ही नेत्यांना फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रिपद नसणार, असे सांगितले जात आहे.
- 11:53 AM • 09 Jun 2024
Modi Cabinet 3.0 Updates : पुण्याला मिळणार कॅबिनेट मंत्री
पुण्याचे माजी महापौर आणि पहिल्यांदाच खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांना पीएमओकडून कॉल आला असल्याची माहिती आहे. त्यांच्या पुतण्याने दिलेल्या माहितीनुसार मोहोळ यांना केंद्रीय मंत्री पदासाठी फोन आलेला आहे.
- 10:26 AM • 09 Jun 2024
Modi Oath Updates 'या' नेत्यांना आला पंतप्रधान कार्यालयातून कॉल?
मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, रक्षा खडसे, जितेंद्र सिंह, अन्नामलाई, हम पक्षाचे जीतनराम मांझी, जेडीएसचे नेते कुमारस्वामी, जदयूचे नेते रामनाथ ठाकूर, लोजपाचे चिराग पासवान, अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल, आरएलडीचे नेते जयंत चौधरी, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, टीडीपीचे मोहन नायडू आणि पी. चंद्रशेखर पेम्मासानी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला आहे. त्यामुळे हे नेते मोदींसोबत शपथ घेणार, हे निश्चित आहे.
- 10:22 AM • 09 Jun 2024
Modi oath Ceremony live : पीयूष गोयल, नितीन गडकरी असणार मोदींच्या मंत्रिमंडळात?
ज्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेला आहे, त्यांना पंतप्रधान कार्यालयातून कॉल करण्यात येतो आणि माहिती दिली जाते. आता समोर आलेल्या माहितीनुसार नितीन गडकरी यांना पंतप्रधान कार्यालयातून कॉल आहे, त्यामुळे गडकरी मोदींच्या मंत्रिमंडळात असतील, हे निश्चित झाले आहे.
त्याचबरोबर पीयूष गोयल यांनाही महाराष्ट्रातून संधी जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रक्षा खडसे यांनाही पंतप्रधान कार्यालयातून कॉल आला असून, त्याही मंत्री होणार हे, निश्चित मानले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांना पंतप्रधान कार्यालयातून कॉल आला असून, तेही शपथ घेणार हे निश्चित मानलं जात आहे.
- 10:15 AM • 09 Jun 2024
Modi Cabinet updates : 40 ते 45 जणांनाच मंत्रिपदाची शपथ?
घटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. पण, समोर आलेल्या माहितीनुसार आजच्या शपथविधी सोहळ्यात 40 ते 45 नेत्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्याकडे एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांनी शपथविधीसाठी नावे दिली असून, त्यांना पंतप्रधान कार्यालयातून कॉल केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT