Sanjay Raut : "गडकरींच्या पराभवासाठी मोदी,शाह, फडणवीसांनी प्रयत्न केले, पण..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा राऊतांचा आरोप.
खासदार संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नितीन गडकरी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत

point

संजय राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Nitin Gadkari Sanjay Raut Lok Sabha election : नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत असलेल्या नितीन गडकरी यांना पाडण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay raut claims that Narendra Modi, Amit Shah And Devendra Fadnavis was trying to defeat of nitin Gadkari in lok sabha election)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर आलेला असतानाच संजय राऊतांनी विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत काय म्हणाले ते वाचा...

"4 जूननंतर भाजपात मोदी-शाहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरींचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरी यांच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात."

योगी को बचाना है, मोदी को जाना है

राऊतांनी असंही म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थक मोदींविरोधात काम करत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "मी सात वेळा...", निकालाआधी मोदींचं पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान 

राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, "जे गडकरी यांचे तेच योगींचे. अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शाहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल."

एकनाथ शिंदे अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी पैसा खर्च केला -राऊतांचा दावा

एकनाथ शिंदेंनी कोट्यवधी रुपये लोकसभा निवडणुकीत खर्च केल्याचे राऊतांनी म्हटले आहे. "महाराष्ट्राने मोदी-शाहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील."

हेही वाचा >> मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' दिवशी येणार मान्सून

"एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले", असे राऊत यांनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT