Lok Sabha : राहुल गांधी होणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पण..

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi can be the leader of opposition in parliment cwc meeting delhi mallikarjun kharge
राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात हे जवळपास निश्चित झालं आहे.
social share
google news

Cwc Meeting: काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता आहे. कारण आजच्या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण या प्रस्तावावर विचार करण्यासाठी राहुल गांधींनी थोडा वेळ मागितला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी आता काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (rahul gandhi can be the leader of opposition in parliment cwc meeting delhi mallikarjun kharge) 

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली.  दिल्लीला पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा होऊन भविष्याची रणनीती ठरविण्यात आली होती. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संसदेतील विरोधीपक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचं काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितलं आहे. तर, काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून राहुल गांधींनी निवड झाल्याचंही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात हे जवळपास निश्चित झालं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Manoj Jarange : ''तुम्ही आरक्षण दिलं मग...'', फडणवीसांवर जरांगे भडकले!

या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या अथक परिश्रमाबद्दल पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, काँग्रेसवर विश्वास व्यक्त करून जनतेने हुकूमशाही आणि संविधानविरोधी शक्तींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.भारतीय मतदारांनी भाजपचे दहा वर्षांचे विभाजन, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण नाकारले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील दोन्ही यात्रांनी काँग्रेसला लोकांशी जोडले गेले आणि त्यांच्या समस्या, चिंता आणि आकांक्षा जाणून घेतल्या. याच आधारावर काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रचाराची तयारी केली.

दरम्यान आजच सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनियांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. गौरव गोगोई आणि तारिक अन्वर यांनी पाठिंबा दिला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मुंबईकरांनो, काम असेल तरच बाहेर पडा! IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT