Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा 'हा' नेता निवडणूक लढवण्यास तयार
Satara Lok sabha Election 2024, Shashikant Shinde : महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
ADVERTISEMENT
Satara Lok sabha Election 2024, Shashikant Shinde : सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंविरोधात (udyanraje bhosale) निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शरद पवार शशिकांत शिंदेंच्या (Shashikant Shinde) नावावर शिक्कामोर्तब करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.( satara lok sabha election 2024 sharad pawar candidate shashikant shinde udyanraje bhosale mahayuti mahavikas aghadi sharad pawar maharashtra politics)
ADVERTISEMENT
सातारा लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. या जागेवर महायुतीकडून उदयनराजे भोसले यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरूद्ध शरद पवार श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवणार होते.मात्र तब्येतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली होती. पाटील यांनी माघार घेतल्यानंतर पवारांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तुतारीच्या चिन्हावर लढवण्याची ऑफर दिली होती. त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे यांचे देखील नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.
हे ही वाचा : मविआत घमासान! पटोले म्हणाले, "संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी"
शशिकांत शिंदे यांनी आज शरद पवारांच्या बैठकीत स्पष्टच सांगितलं, कोण लढतय का बघा? नाहीतर शशिकांत शिंदे आहेच, अशा शब्दच त्यांनी देऊन टाकला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शशिकांत शिंदे बोलत होते.भाऊ भेटले तेव्हा ते बोलले साताऱ्याच काय? अस म्हणताच (शशिकांत शिंदे जिंदाबाद अशी घोषणा महिलेने दिली) यावर शिंदे म्हणाले, माझी उमेदवारी तुम्ही ठरवू नका. तसेच शरद पवार यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. संघर्षाचा काळ आला आणि कोण उभा राहणार अशी चर्चा सुरू झाली. शरद पवारांच्या बैठकीत सांगितलं कोण लढतय का बघा नाहीतर शशिकांत शिंदे आहेच, असे शिंदेंनी म्हटले.
हे वाचलं का?
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, विषय पदाचा नसतो, विषय हा संघर्षाचा असतो. ज्यावेळी संघर्षासाठी आपले नेते उभे राहतात. त्यावेळी संघर्ष करण्यासाठी सैन्यानीही तसेच उभे राहिले पाहिजे. परिणामाचा विचार केला नाही पाहिजे. यांनी मगाशी केजरीवाल अशी नावं घेतली. माझ्यावरही केस टाकली, अशे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान आता शरद पवार शशिकांत शिंदेंना साताऱ्याची उमेदवारी देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : सुप्रिया सुळेंना धक्का, प्रचारप्रमुखच अजित पवारांच्या गळाला!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT