Maha Vikas Aghadi : मविआत घमासान! पटोले म्हणाले, "संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी"

योगेश पांडे

ADVERTISEMENT

सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत अजूनही तिढा.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

संजय राऊतांच्या विधानामुळे काँग्रेसचे नेते नाराज

point

नाना पटोले यांनी उपरोधिक शब्दात राऊतांना सुनावले

Sangli lok Sabha election, Maha Vikas Aghadi : (स्वाती चिखलीकर, सांगली) सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत घमासान बघायला मिळत आहे. संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यात मविआ एकजूट नसल्याचे चव्हाट्यावर आले. त्यामुळे संतापलेल्या राऊतांनी नौटंकी थांबवा, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना सुनावले. पण, यावर आता काँग्रेसमधूनही तिखट प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे सांगलीसाठी काँग्रेस-शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघर्ष अजूनही धगधगताच आहे. (Deadlock still going on between Congress and Shiv Sena UBT over sangli lok sabha in Maha Vikas Aghadi)

ADVERTISEMENT

संजय राऊत तीन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याकडे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी फिरकलेच नाही. त्यामुळे राऊतांनी आपला संताप व्यक्त केला. "काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले आहे की, तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सांगलीत सामील व्हा", असे राऊत म्हणाले. आता या विधानाने महाविकास आघाडीत ठिणगी टाकली आहे.

नाना पटोलेंनी राऊतांना सुनावले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूरमध्ये बोलताना म्हणाले की, "आधी संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या थांबवाव्यात. खरंतर ते एक मोठे नेते आहेत, शिवसेनेचे. त्यांनी काय बोलावं, त्याच्या मर्यादा त्यांनी ठेवाव्यात. मी वारंवार सांगतोय की, सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडवू. वरिष्ठांच्या पातळीवर सोडवू. एका छोट्या कार्यकर्त्यासारखं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये, असा माझा सल्ला त्यांना आहे", अशा शब्दात पटोलेंनी राऊतांना सुनावले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंना अजित पवारांचा धक्का, प्रचारप्रमुखच फोडला! 

ते म्हणाले की, "एक-दोन दिवसांत... जमलं तर उद्याच आम्ही प्रश्नावर पडदा टाकू. कारण काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की, देशात संविधान विरोधी जे सरकार आहे, ते सत्तेत आलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्हाला काहीही परिणाम भोगावे लागले, तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. अशा वेळी अशा पद्धतीचे एखाद्या लहान कार्यकर्त्यासारखं एका मोठ्या व्यक्तीने वक्तव्य करावं, हे पचणार आहे. म्हणून त्यांनी त्यात सुधारणा करावी एवढाच सल्ला आमचा आहे", असे पटोले म्हणाले. 

शिवसेनेचा मैत्रीपूर्ण लढतीला विरोध 

"सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडून सुद्धा तशी घोषणा केली जाईल. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांचाच प्रचार करतील", असे संजय राऊत सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "पक्ष सोडला नाही तर तुरूंगात जावे लागेल", राऊतांचा चव्हाणांबद्दल मोठा दावा

राऊत पुढे म्हणाले की, "मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात."

ADVERTISEMENT

"माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे. याबाबत विश्वजीत कदम यांच्याबरोबर सुद्धा माझ्या फोनवर बोलणं झालं आहे", अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT