Lok Sabha : शिंदे 'ही' जागा गमावणार, तर ठाकरेंच्या पारड्यात विजय; सट्टा बाजाराचा अंदाज

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

satta bazar prediction on lok sabha election yavamal washim lok sabha seat eknath shinde vs udhhav thackeray rajashri patil vs sanjay deshmukh
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात शिंदे विरूद्ध ठाकरे लढत झाली.
social share
google news

Satta Bazar Prediction 2024 : देशात लोकसभेच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सातव्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जूनला पार पडणार आहे. हे मतदान संपताच लगेच संध्याकाळी एक्झिट पोलचे (Exit Poll 2024) आकडे समोर येणार आहेत. या एक्झिट पोलमधून निकालाचे अंदाज बांधले जाणार आहे. तत्पुर्वी सट्टा बाजाराने (Satta Bazar) यवतमाळ वाशिम (Yavatmal Washim Lok sabha) मतदार संघात ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  (satta bazar prediction on lok sabha election yavamal washim lok sabha seat eknath shinde vs udhhav thackeray rajashri patil vs sanjay deshmukh)

ADVERTISEMENT

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात एकनाथ शिंदेंची शिवसेना विरूद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत आहे. या मतदार संघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात येणार होती.मात्र भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. त्यामुळे शिंदे गटाने खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली होती. आता राजश्री पाटील यांच्याविरूद्ध ठाकरेंच्या शिवसेनेने संजय देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे येथे शिंदे विरूद्ध ठाकरे लढत झाली. 

हे ही वाचा : भुजबळांकडून थेट आव्हाडांची पाठराखण, महायुतीलाच सुनावलं!

आता या मतदार संघावर सट्टा बाजाराने अंदाज व्यक्त केला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलूनही शिंदेंना फटका बसणार, असा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. येथून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख हे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही जागा ठाकरेंची शिवसेना जिंकेल, असा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे. 

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, सट्टा बाजाराचा अंदाज काय?

1) नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे जिंकतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. 

2) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल, असे भाकित सट्टा बाजाराने केले आहे. येथून प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत आहेत. 

ADVERTISEMENT

3) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलूनही शिंदेंना फटका बसणार, असा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. येथून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख हे निवडणूक लढवत आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार ही जागा ठाकरेंची शिवसेना जिंकेल. 

ADVERTISEMENT

4) गेल्यावेली अपक्ष खासदार झालेल्या नवनीत राणा यावेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. पण, त्यांना यावेळी झटका बसेल, असा अंदाज आहे. अमरावतीची जागा काँग्रेस जिंकेल, असे सट्टा बाजाराचे भाकित आहे. येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडणूक लढवत आहेत. 

हे ही वाचा : 'भाजप-NDA महाराष्ट्रात 'एवढ्या' जागांवर हरणार'

5) महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुप्रिया सुळे विजयी होतील, असे सट्टा बाजाराचा अंदाज आहे.

6) भाजपने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. ते विजयी होतील, असा अंदाज आहे. 

7) शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव होईल. तर शाहू छत्रपती हे विजयी होतील, असा अंदाज सट्टा बाजाराने मांडला आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT