Sharad Pawar : मोदींच्या गॅरंटीची शरद पवारांनी उडवली खिल्ली, शिवाजी पार्कच्या मैदानावर काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 sharad pawar criticize modi gaurantee narendra modi on bharat jodo nyay yatra mumbai shivaji park rahul gandhi
1942 मध्ये याच मुंबईच्या शहरातून महात्मा गांधी यांनी छोडो हिंदुस्तान आणि छोडो हुकुमशाहीचा नारा दिला होता.
social share
google news

Sharad Pawar Criticize PM Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातून होत आहेत. या सभेला इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहेत. तसेच मोदींच्या गॅरंटीची देखील खिल्ली उडवली. 1942 मध्ये मुंबईतूनच महात्मा गांधींनी छोडो हिंदुस्तान आणि छोडो हुकुमशाहीचा नारा दिला होता. पण आता छोडो भाजपा, भाजपसे मुक्ती, असा नारा द्यावा लागेल असे शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितेल. 

ADVERTISEMENT

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, देशात सध्या जी अवस्था झाली, त्यात बदल आणण्याची गरज आहे.  हा बदल आपण मिळवू घडवून आणू शकतो, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच ज्या लोकांनी (पंतप्रधान मोदी) नागरीकांना वेगवेगळे आश्वासन देऊन फसवले, त्यांना सत्तेपासून दुर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपल्यावर मतदानाची वेळ येईल, त्यावेळेस आपल्याला पाऊस उचलावे लागणार आहेत, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Madha Lok Sabha : भाजप कार्यकर्त्यांनीच अडवली गिरीश महाजनांची गाडी

तसेच ज्या लोकांच्या (पंतप्रधान मोदी) हातात सत्ता आहे. त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांपासून मजुरांना, तरूणांना, महिलांना, आदिवासींना आश्वासन दिली होती. या कोणत्याही घटकांची आश्वासन त्यांनी (पंतप्रधान मोदी)  पुर्ण केली नाही. त्यामुळे यांना (पंतप्रधान मोदी) सत्तेपासून दुर करण्यासाठी आपल्याला मिळून पावलं उचलावी लागणार आहेत. ही संधी आपल्याला पुढच्या महिन्यात चालून आली आहे,असे शरद पवारांनी सांगितले. 

हे वाचलं का?

गेल्या काही महिन्यांपासून आपण टीव्हीवर एकच खोटी गोष्ट पाहतोय.  मोदींची गॅरंटी...,पण ही गॅरंटी चालणारी गॅरंटी नाही, या गॅरंटीत कुठलीच सुरक्षितता नाही आहे. त्यामुळे चुकीची गॅरंटी देऊन, चुकीचे आश्वासन दिले जात असल्याची टीका शरद पवारांनी मोदींवर केली. आजपासून एक गोष्ट चांगली झाली आहे, ती जाहिरात आता टीव्हीवर येणार नाही. त्यांना थांबण्याच काम इलेक्शन कमिशनने केली आहे. त्यामुळे मी त्यांचे ही आभार मानतो, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Crime : मित्रानेच काढला मित्राचा काटा, पुर्ववैमनस्यातून... इंदापूर हत्याकांडाची Inside Story

दरम्यान 1942 मध्ये याच मुंबईच्या शहरातून महात्मा गांधी यांनी छोडो हिंदुस्तान आणि छोडो हुकुमशाहीचा नारा दिला होता. आता आपल्याला छोडो भाजपा, भाजपसे मुक्ती करण्याचा नारा द्यावा लागणार आहे, अशी टीका पवारांनी मोदींवर केली.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT