Vijay Shivtare : 'मेला तर पुन्हा बाय इलेक्शन', अजित पवारांची शिवतारेंनी उडवली झोप

भागवत हिरेकर

Vijay Shivtare Ajit Pawar Baramati Lok Sabha Elections 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होत असून, त्यात आता विजय शिवतारेंनी उडी घेतली आहे.

ADVERTISEMENT

ज्यांना पवारांना मतदान करायची इच्छा नाही, त्यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे"
विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम

point

बारामती लोकसभा मतदारसंघात समीकरण काय

point

अजित पवारांना शिवतारेंचं आव्हान

Baramati lok sabha elections 2024 : बारामतीमध्ये अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याचा निर्धार केला, पण आता त्यांच्यासमोर अडचणी वाढताहेत. सुनेत्रा पवारांचे नाव घोषित झाल्यानंतर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले. बदला घेण्याची वेळ आलीये, असे म्हणत शिवतारे मैदानात उतरलेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठींनी अजित पवारांची चिंता वाढलीये. अशात एका मुलाखतीत शिवतारेंनी जुन्या विधानाची आठवणही पवारांना करू दिली आहे. (Vijay Shivtare on Contesting Loksabha Elections 2024 from Baramati)

टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विजय शिवतारे यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. विजय शिवतारे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी थोपटेंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 

अनंतराव थोपटे काय म्हणाले?

"आमचा विजय शिवतारेंना आशीर्वाद आहे. ज्यावेळी आम्ही होतो, त्यावेळी शरद पवार विरोधात होते. आणि दिल्ली माझ्याबरोबर होती, अशा वेळी माझा पराभव झाला. तो कसा झाला, काय झाला.. हे सगळ्यांना माहिती आहे. आता काय झालंय की, शरद पवारांची मुलगी इथे उभी आहे. नंतर त्या अजित पवारची बायको उभी आहे. आता शिवतारे उभे आहेत", अशी भूमिका थोपटे यांनी शिवतारेंच्या भेटीनंतर मांडली.

हेही वाचा >> भाजपकडून निंबाळकरांना तिकीट, धैर्यशील पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन 

अजित पवारांचे विधान शिवतारेंच्या जिव्हारी

२०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना थेट आव्हान दिले होते. त्यांनी एका भाषणात केलेली टीका विजय शिवतारेंच्या जिव्हारी लागली होती. त्याचीच आठवण सांगत शिवतारेंनी अजित पवारांना ललकारलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp