Mumbai South Lok Sabha : महायुतीत शिंदेंनी दक्षिण मुंबईची जागा राखली! जाधवांना उमेदवारी
Mumbai South Lok Sabha Shiv Sena Candidate
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
यामिनी जाधव विरुद्ध यामिनी जाधव
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुणाचे किती आमदार?
Yamini Jadhav Mumbai South Lok Sabha : दक्षिण लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार याची उत्सुकता संपली. भाजपकडून तयारीला लागलेल्या राहुल नार्वेकर यांच्या पदरी निराशा आली असून, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामिनी जाधव या विद्ममान आमदार आहेत. यानिमित्ताने आणखी एका मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळणार आहे. (Yamini Jadhav declared as Shiv Sena (Shinde camp) candidate from South Mumbai lok sabha)
ADVERTISEMENT
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मागील दोन वेळा शिवसेनेने जिंकलेला आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांनी तयारी सुरू केली होती. पण, आता ही जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दक्षिण मुंबईच्या जागेबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले...
"हा निर्णय आधीच झाला होता. मुंबईमध्ये तीन जागा भाजपने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या. अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता. सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी, असे आमच्या मनामध्ये होते. त्यामुळे काही आमचे लोक तयारी देखील करत होते. २०-२५ दिवसांपूर्वीच हा निर्णय झालेला आहे", देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हे वाचलं का?
अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या थेट लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघातून उमेदवार दिला आहे. अफजल दाऊदनी यांना वंचितने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा >> 'या' प्रकरणामुळे यामिनी जाधवांची आमदारकी आली होती धोक्यात?
दक्षिण मुंबई लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यात वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी हे आमदार आहेत.
ADVERTISEMENT
भायखळा विधानसभा मतदारसंघातून स्वतः यामिनी जाधव या उमेदवार आहेत. तर मलबार हिल मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा हे आमदार आहेत. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमीन पटेल हे आमदार आहेत, तर कुलाबामधून राहुल नार्वेकर आमदार आहेत.
ADVERTISEMENT
त्यामुळे या मतदारसंघात तीन आमदार महाविकास आघाडीचे आहेत, तर तीन आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे विधानसभेतील बलाबल समान आहेत. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेचा पगडा जास्त असल्याने आता ठाकरे आणि शिंदेंची खरी कसोटी आहे. या मतदारसंघातील शिवसैनिक आणि मतदार कोणत्या शिवसेनेला कौल देतो, हेही या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT