Shirur Lok Sabha : "शिंदेंच्या डोक्यात भुजबळांना उमेदवारी द्यायचं होतं", कोल्हेंचा स्फोटक दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Amol Kolhe Eknath Shinde Chhagan Bhujbal : शिवाजीराव आढळराव पाटील हे पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

social share
google news

Amol Kolhe, shivajirao adhalarao patil, Shirur Lok Sabha : शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिवसेनेतून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पण, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच अमोल कोल्हे यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली आहे. (Amol Kolhe claimed that Eknath Shinde was nominating Chhagan Bhujbal against me)

"मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) माझ्याविरोधात छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते", असे कोल्हे यांनी म्हटले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भोसरी येथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे यांनी हे विधान केले आहे. 

अमोल कोल्हे नेमकं काय बोलले?

या मेळाव्यात बोलताना कोल्हे म्हणाले, "विरोधी उमेदवारांविषयी फार काही भाष्य मी करू इच्छित नाही. कारण सक्षम जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या पसंतीचा उमेदवार समोर असता, तर बोलायला मजा आली असती."

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"मीडियात बातमी आली होती की, समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले, तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. उमेदवारी खरंतर वेगळ्याच ठिकाणी देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. जी बातमी मला मीडियातून ऐकायला मिळाली, त्यानुसार छगन भुजबळांना उमेदवारी ही मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होती. पण, छगन भुजबळांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव ठाकरेंना धोका देऊन शिंदेंच्या शिवसेनेत गेले, तिथून उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना २०१९ मध्ये हिंमत असेल, तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात जाऊन देत होते, त्यांच्याच वळचणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली. अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल, तर अशा उमेदवाराबद्दल फार बोलणं मला योग्य वाटत नाही", असे कोल्हे म्हणाले. 

शिवाजीराव आढळराव पाटील काय म्हणाले?

अमोल कोल्हे यांच्या विधानावर आढळराव पाटील म्हणाले की, "कोल्हे बालिश विधानासाठी प्रसिद्ध आहेत. कोल्हे आणि संजय राऊत काहीही विधानं करतात. त्याला काही बेस नसतो. छगन भुजबळ जर राष्ट्रवादीचे असतील, तर शिंदे कशाला असं विधान करतील? आपण (अमोल कोल्हे) असा बालिशपणा करू नये. कोल्हे सकाळी उठून संजय राऊत सारखे काहीही बालिश विधानं करतात", असे म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंना उत्तर दिले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT