Lok Sabha Election 2024: 'तुम्ही आमच्यासाठी काय केले?' BJP च्या भारती पवारांवर मतदार संतापले!
Bharati Pawar: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना मतदारांचा प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. पाहा दिंडोरीत नेमकं काय घडलं.

ADVERTISEMENT
Bharati Pawar Dindori Lok Sabha: प्रविण ठाकरे, दिंडोरी: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. भारती पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय मंत्रिमंडळात आपले स्थान निश्चित केले. हुशार आणि अभ्यासू खासदार अशी त्यांची लोकसभेत ओळख आहे. तसंच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील त्यांचा बराच दबदबा होता. मात्र, आत याच मतदारसंघात त्यांना सामान्य मतदार थेट सवाल विचारत आहेत. एवढंच नव्हे तर प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागत आहे. (lok sabha election 2024 what have you done for us voters are angry with bjp candidate and bharti pawar dindori)
नेमकं काय घडलं दिंडोरीत?
2019 लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या होत्या. तरीही दिंडोरी मतदारसंघातील मतदारांनी त्यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देखील मिळालं.
दरम्यान, आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आल्यानंतर मतदारसंघात विकास झाला नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी सरकारने ठोस भूमिका घेतल्या नाही असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले त्यामुळे भारती पवारांबाबत मतदारसंघात काहीशी नाराजी असल्याचं दिसत आहे.
हे ही वाचा>> "राम सातपुते दोन लाख मतांनी पडतील", जानकरांचं मोठं भाकित
आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारती पवार यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भारती पवार यांचा आज (24 एप्रिल) दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनखेडा येथे प्रचार दौरा सुरू असताना तेथील नागरिकांनी भारती पवारांना थेट 'तुम्ही आमच्यासाठी काय केले?' असा सवाल करत आपला संताप व्यक्त केला.