Baramati Lok Sabha Elections 2024 : काकाचा डाव पुतण्याने उधळला, जानकर निकाल बदलणार!

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Big Blow To Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमदेवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. आता अजित पवारांनी जानकरांना महायुतीत ठेवण्यात यश मिळवले आहे.

social share
google news

Baramati Lok Sabha Elections 2024, Mahadev Jankar : 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवून चार लाखांपेक्षा अधिक मते घेणाऱ्या महादेव जानकर यांनी यु टर्न घेतला. शरद पवारांसोबत चर्चा करत असतानाच महायुतीने एक जागा दिल्याने जानकरांनी भूमिका बदलली. शरद पवारांकडून माढा लोकसभेसाठी जानकरांना महाविकास आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, ऐनवेळी अजित पवारांनी डाव उधळून लावत बारामतीचे गणित बदलल्याचे म्हटले जात आहे. महादेव जानकर यांची भूमिका बारामती, माढा लोकसभा मतदारसंघात किती आणि का महत्त्वाची हेच समजून घ्या या व्हिडीओतून...

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सध्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगताना दिसत आहे. अजित पवारांविरोधात आता पवार कुटुंबच मैदानात उतरले आहे. दुसरीकडे अजित पवारांचे राजकीय विरोधकही एकवटताना दिसत आहे. 

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे अजित पवारांविरोधात भूमिका घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत अजूनही अजित पवारांचं वैर शमलेलं नाही. त्यामुळे अजित पवारांकडून आता इतर पर्याय आणि डाव पेच अवलंबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महादेव जानकर यांना महायुतीत कायम ठेवण्याकडे बघितले जात आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT