Advertisement

Simran Sachdeva : ९ वर्षांच्या मुलाने सायकलने धडक दिली आणि अभिनेत्रीने गाठले थेट पोलिस स्टेशन

टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका 9 वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
TV actress Simran Sachdeva registered FIR against 9-year-old boy
TV actress Simran Sachdeva registered FIR against 9-year-old boy

टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका 9 वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीमध्ये या मुलाने आपल्या आईला सायकल चालवत असताना धक्का दिला होता. त्यामुळे सिमरन सचदेवाने थेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या गोरेगाव येथील लोढा फिरोअन्झा इमारातीत राहणाऱ्या टिव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा हिने एका 9 वर्षाच्या मुलावर गोरेगाव येथील वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २७ मार्च रोजी घडली होती.इमारतीत सायकल चालवत असताना अभिनेत्री सिमरन सचदेवा हिच्या 65 वर्षीय आईला मुलाने सायकलने धडक दिली. ज्यामुळे सिमरनची आई जमिनीवर कोसळली आणि त्यांच्या पाठीला दुखापत झाली. गेली दीड महिने सिमरनची आई अंथरुणात खिळून आहे.

या घटनेनंतर सिमरन यांना मुलाच्या आईने फक्त व्हॉटसअपवर सॉरी मॅसेज करुन माफी मागितली. पण घडलेल्या घटनेची जबाबदारी मात्र कोणीच घेतली नाही. त्यामुळे मुलं नेमकं काय करतायेत आणि त्यांनी केलेल्या चुकांना आई वडील जबाबदार नाही का? असा प्रश्न उपस्थित करत अभिनेत्रीने थेट 9 वर्षाच्या मुलाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली. सिमरन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मुलांवर बेजबाबदारपणाचा गुन्हा मुलावर दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.मी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या आईने मला व्हॉटसअपवर मेसेज पाठवून माफी सुद्धा मागितली. पण, या प्रकरणात मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करायचा होता. अत्यंत निष्काळजीपणे त्याने जिथे सोसायटीमध्ये लोक चालतात तिथे हा प्रकार केला आहे, त्यामुळे गुन्हा दाखल केला. अशी प्रतिक्रिया सिमरन सचदेवाने दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in