आजकाल सोशल मीडियावर सेलिब्रिटींप्रमाणे स्टार किड्सची चर्चाही जोरदार असते. याच स्टार किड्समधील एक किड म्हणजे आराध्या बच्चन. आराध्या बच्चन सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. कारण आराध्याच्या डान्सचा व्हीडियो चांगलाच व्हायरल झालाय. या व्हीडियोमध्ये आराध्या अभिषेक बच्चन याच्याच एका गाण्यावर डान्स करतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये आराध्या तिची आई ऐश्वर्या राय बच्चन आणि बाबा अभिषेकसोबत डान्स करतेय. तर हे गाणं अभिषेकच्या ‘दोस्ताना’ सिनेमातील ‘देसी गर्ल’ आहे. माहितीनुसार, हा व्हीडिओ ऐश्वर्याच्या नातेवाईकांच्या लग्नातला. तिघांच्याही डान्सचा हा व्हीडियो तुफान व्हायरल झाला असून अनेक नेटकरी त्यावर कमेंट्स करतायत.
डान्स करताना आराध्याने पिंक कलरचा गाऊन घातला आहे. तर ऐश्वर्याने सिल्वर कलरचा ड्रेस घातलाय. दोघीही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत असून त्यांनी ड्रेसप्रमाणे मॅचिंग मास्कही लावलेत.
दरम्यान यापूर्वी एका कार्यक्रमात आराध्याने तिचा डान्स परफॉर्मन्स दाखवला होता. त्यावेळी लहानग्या आराध्याने गली बॉयच्या गाण्यावरही ठेका धरला होता. तिच्या हा डान्स पासून प्रेक्षकंही फार खूश होते. आराध्याच्या या डान्सला देखील सोशल मीडियावर पसंती मिळाली होती.