अर्जुन मलायका एकत्र लंच डेटवर, ब्रेक अपच्या चर्चांना फुलस्टॉप
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अशात अर्जुन मलायका यांचा लंच डेटचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. दोघांचं ब्रेक अप झालं आहे. मलायकाने स्वतःला घरात कोंडून घेतलं आहे अशा सगळ्या बातम्या येत होत्या. मात्र हे दोघे लंच डेटला […]
ADVERTISEMENT

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अशात अर्जुन मलायका यांचा लंच डेटचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. दोघांचं ब्रेक अप झालं आहे. मलायकाने स्वतःला घरात कोंडून घेतलं आहे अशा सगळ्या बातम्या येत होत्या. मात्र हे दोघे लंच डेटला एकत्र भेटल्याचा फोटो समोर आला आणि या सगळ्या बातम्या म्हणजे अफवा होत्या हे सिद्ध झालं आहे.
नुकतंच मलायका आणि अर्जुन कपूर या दोघांना मुंबईतल्या एका रेस्तराँच्या बाहेर स्पॉट केलं गेलं आहे. लंच डेट साठी हे दोघे भेटले होते. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की या दोघांचं ब्रेक-अप वगैरे काहीही झालेलं नाही. लंच डेटसाठी मलायका खास पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. तर अर्जुन कपूर ब्लू कपूरच्या हुडीमध्ये दिसला. दोघांचा हा फोटो समोर आल्याने त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चा संपल्या आहेत.