धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचं आगमन

मुंबई तक

तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकर हिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धनश्रीने ही गोड बातमी तिच्या चाहत्यापर्यंत पोहोचवली आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, “आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज सकाळी मी मुलाला जन्म दिला. माझी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकर हिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धनश्रीने ही गोड बातमी तिच्या चाहत्यापर्यंत पोहोचवली आहे.

धनश्रीने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, “आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज सकाळी मी मुलाला जन्म दिला. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यावाद.” धनश्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हे वाचलं का?