तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकर हिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. धनश्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धनश्रीने ही गोड बातमी तिच्या चाहत्यापर्यंत पोहोचवली आहे.
धनश्रीने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, “आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज सकाळी मी मुलाला जन्म दिला. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यावाद.” धनश्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
धनश्री पहिल्यापासून सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते. गरोदर असल्यापासूनच धनश्रीने बेबी बम्पच्या शूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडला होता. धनश्रीसह तिच्या चाहत्यांनाही बाळाच्या आगमनाची उत्सुकता होती. अखेर धनश्रीच्या घरी चिमुकल्या मुलाचं आगमन झालं आहे.
2013 साली धनश्रीने दुर्वेश याच्याशी लग्नगाठ बांधली होती. दुर्वेश हा इंजिनीयर आहे. धनश्रीने तुझ्यात जीव रंगलासोबत गंध फुलांचा गेला सांगून आणि जन्मगाठ या मालिकांमध्ये भूमिका साकारली होती.