अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरेचा साखरपुडा झालाय. काही महिन्यांपूर्वीच नुपूर शिखरेनं आयरा खानला प्रपोज केलं होतं. प्रपोज करतानाचा व्हिडीओ आयरा खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आता दोघंही अधिकृतपणे नात्यात बांधले गेले आहेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या साखरपुड्याला अभिनेता आमिर खानसह त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या एंगेजमेंटचा फोटो
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा झाल्यानंतर काही फोटो समोर आले आहेत. साखरपुड्यानिमित्त खास गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेही पोझ देताना दिसून आला.
आयरा खानने साखरपुड्यानिमित्त लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेनं ब्लॅक कलरचा टॅक्सिडो घातलेला होता. साखरपुड्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आमिर खानही यावेळी पोझ देताना दिसला.
आमिर खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातलेला होता. तर काळा चश्मा होता. आमिर खानची पहिली पत्नी आणि आयरा खानची आई रिना दत्ताही या कार्यक्रमाला स्टायलिश अंदाजात हजर होती.
रिना दत्ताने आयरा खान-नुपूर शिखरेच्या साखरपुड्यानिमित्त क्रीम आणि पिवळ्या रंगाची साडी नेसलेली होती. साडीवर रिना दत्ता सुंदर दिसत होती.
आयरा खानच्या आईवडिलांशिवाय तिचा भाऊ जुनैद खान, किरण राव आणि छोटा भाऊ आझाद रावही हजर होते. आयरा खानची आजी जीनत हुसैन आणि चुलत भाऊ इमरान खानही कार्यक्रमाला हजर होते.
आमिर खानच्या दोन्ही बहिणी निखत आणि फरहतही साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी अभिनेत्री फातिमा सना शेखही दिसली. यावेळी आमिर खानचा लुक बघून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आमिर खानची दाढी पूर्ण पांढरी झाली आहे. पहिल्यांदाच आमिरचा असा लुक दिसला.
लॉकडाऊनमध्ये आयरा खान-नुपूर शिखरेची जुळली होती मने
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्यातील नात्याची सुरुवात 2020 मध्ये झाली होती. नुपूर स्टारकिड जीम ट्रेनर होता. नुपूर शिखरे आमिर खानचाही जीम ट्रेनर होता. लॉकडाऊनच्या काळात आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्यातील अंतर कमी होत गेलं आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, असं सांगितलं जातं.
इन्स्टाग्रामवर आयरा आणि नुपूरने त्यांच्यातील नात्याची घोषणा केली होती. सप्टेंबर 2022 मध्ये नुपूर शिखरेने एका स्पर्धेदरम्यान, आयरा खानला प्रपोज केलं होतं. त्यानंतर आता आयरा खान आणि नुपूर शिखरेंनं कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे.