आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ... मित्राच्या मेव्हणीचं आयुष्य केलं उद्धवस्त, वैतागलेल्या तरुणीने काय केलं?
उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्राच्या मेव्हणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं आयुष्य उद्धवस्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मित्राच्या मेव्हणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केलं ब्लॅकमेल

आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

वैतागून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
Crime News: उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्राच्या मेव्हणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं आयुष्य उद्धवस्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे. खरंतर, या जिल्ह्यातील रावतपुरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या पत्नीची प्रसूती होणार होती. त्यावेळी तिची काळजी घेण्यासाठी पत्नीच्या बहिणीला म्हणजेच मेव्हणीला घरी बोलावण्यात आलं.
पार्टीमध्ये दिलं चॅलेन्ज...
व्यवस्थितरित्या डिलीव्हरी झाल्यानंतर त्यांच्या घरात मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. त्या दिवशी त्या तरुणाचा गौरव नावाचा मित्राचा मित्र देखील पार्टीमध्ये आला होता. पार्टीमध्ये गौरवने मित्राच्या मेव्हणीला पाहिले आणि त्यावेळी त्याने तरुणाला मेव्हणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून दाखवण्याचं चॅलेन्ज दिलं. यावर तरुण म्हणाला, “तू असं काहीच करू शकणार नाहीस.” यानंतर काही दिवसांतच गौरवने आपल्या मित्राच्या मेव्हणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि तिचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडीओज काढले.
हे ही वाचा: मेव्हणी-भाऊजीचं बेडरूममध्ये गुपचूप सुरु होतं झापुक-झुपूक! पतीनं रंगेहाथ पडकलं अन् घडलं मोठं कांड..
दाजीने दिला सल्ला पण त्याआधीच...
गौरवचं आचरण म्हणजेच वागणं योग्य नसल्याने पीडितेला तिच्या दाजीने गौरवपासून लांब राहण्यास सांगितलं. मात्र, या सगळ्याला खूप वेळ झाला होता. पीडितेला सावध करण्याआधीच आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडीओज काढले होते. दाजीच्या म्हणण्यानुसार, पीडितेने आरोपीशी बोलणं आणि त्याला भेटणं थांबवलं. मात्र, यानंतर गौरवने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. ‘जर भेटली नाहीस तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेन’, अशी धमकी तो देऊ लागला.
हे ही वाचा: सेल्फी घेणं जीवावर बेतलं, तरुणाचं करिअर सुरु होण्यापूर्वीच संपलं, थरारक व्हिडिओ आला समोर
वैतागलेल्या तरुणीचे आयुष्य संपवलं
गौरवचं सतत धमक्या देणं आणि ब्लॅकमेल करणं पीडितेला असह्य होऊ लागलं. या सगळ्याला वैतागून अखेर तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. गौरवच्या वागण्यामुळे आणि त्याच्या धमक्यांना घाबरून तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप पीडितेची बहीण आणि दाजीने केला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या बहिणीने केलेल्या तक्रारीवरुन गौरवच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे.