दाजी आणि मेव्हणीचा बेडरूममध्ये ऐन रंगात आलेला रोमान्सचा खेळ, पतीची एंट्री झाली तरी...

मुंबई तक

झारखंडच्या गोड्डामधून महिलेने तिच्या दाजीसोबत मिळून पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

दाजी आणि मेव्हणी एकत्र खोलीत, बेडरूममध्ये घुसला पती अन्...
दाजी आणि मेव्हणी एकत्र खोलीत, बेडरूममध्ये घुसला पती अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दाजी आणि मेव्हणीचे अनैतिक संबंध

point

पतीने पाहिलं अन् गळा दाबून केली हत्या

Extra marital affair news: झारखंडच्या गोड्डामधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. महिलेने तिच्या दाजीसोबत मिळून पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, महिलेच्या पतीने तिला तिच्या दाजीसोबत एका खोलीत शारीरिक संबंध बनवताना पाहिलं होतं. बायकोला तिच्या दाजीसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर पतीचा पारा चढला आणि त्याने दोघांना या सगळ्या प्रकाराबद्दल जाब विचारला. 

गळा दाबून केली हत्या... 

त्यावेळी पतीला पाहून महिलेला मोठा धक्का बसला. त्यावेळी ती तिच्या पतीच्या पाया पडू लागली. त्यावेळी माफी मागण्याच्या बहाण्याने तिने नवऱ्याचे पाय पकडले आणि त्याचे दोन्ही पाय ओढून त्याला खाली पाडलं. त्यानंतर महिलेचा दाजीसुद्धा मागून आला आणि महिलेच्या नवऱ्याचा गळा दाबून त्याला मारून टाकलं. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. मृताच्या मुलाने त्याच्या वडिलांचा मृतदेह पाहिला आणि जोरात ओरडू लागला.  हे सगळं त्याची आई आणि काकांनी मिळून केलं असल्याचं मुलाला सुद्धा कळालं. 

पोडियाहाट परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणाबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली. मात्र, तिचा दाजी अद्याप फरार असून त्याचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेतील मृत व्यक्ती मुर्गाबनीची रहिवासी असून तिचं नाव सहबुल असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आरोपींची नावं मोसीना आणि अन्सारी असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे ही वाचा: 20 वर्षे लहान तरुणावर जडलं प्रेम! पतीला दिलं मंगळसूत्र आणि दोन मुलांना सोबत घेऊन...

पत्नीला पाहिलं आक्षेपार्ह स्थितीत

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी उशिरा काम संपवून महिलेचा पती घरी आला आणि तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला तिच्या दाजीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिली. पतीने याबद्दल जाब विचारला असता त्याच्या पत्नीने पतीचे पाय धरले आणि दोन्ही पाय ओढून त्याला खाली पाडले. त्यानंतर महिलेच्या प्रियकराने म्हणजेच तिच्या दाजीने पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर फेकून दिला. मृत व्यक्तीचा मोठा मुलगा अताउलने लोकांना बोलवून घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. तसेच, त्याची आई आणि काकाने मिळून त्याला याबद्दल कोणालाही सांगितलं असता मारून टाकण्याची धमकी दिली, असं देखील त्याने सांगितलं.

मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा तयार करून तो ताब्यात घेतला. आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली.

हे ही वाचा: मुलीने पाहिले आईचे 'ते' कारनामे! ठार मारून बेडमध्ये टाकलं आणि मृतदेह काढून परफ्यूम...

फरारा आरोपीचा तपास सुरू

2010 मध्ये साहबुलचं लग्न मोसीनाशी झालं होतं. त्या दोघांना दोन मुलं आहेत. त्यापैकी एक 10 वर्षांचा आहे, तर दुसरा 5 वर्षांचा आहे. पण मोसीनाचे तिचा दाजी अन्सारीसोबत प्रेमसंबंध होते. सध्या मोसीनाला पोलिसांनी अटक केली आहे. तिची चौकशी सुरू असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp