'त्या' नादात महिलेने गमावला स्वत:चा जीव... नेमकं काय घडलं?
मेरठचे भाजप महानगर सरचिटणीस अरविंद गुप्ता मारवाडी यांच्या लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात सर्जरी केली अन् असह्य वेदनेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात जीव गमावला
वजन कमी करण्यासाठी केली बेरिएट्रिक सर्जरी
असह्य वेदना अन् मृत्यू
मेरठचे भाजप सरचिटणीस अरविंद गुप्ता मारवाडी यांची लहान बहीण रजनी गुप्ता यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. रजनी लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेल्या होत्या. त्यांनी बारीक म्हणजेच सडपातळ व्हायचं होतं. वजन कमी करण्यासाठी त्या बरेच उपाय करत होत्या. मात्र, वेट लॉसच्या प्रयत्नात घेतलेला एक निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. रजनी यांच्या या निर्णयामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
सध्या वजन कमी करण्यासाठी लोक बेरिएट्रिक सर्जरी करत असल्याचं पाहायला मिळतं. रजनी गुप्ता यांनी सुद्धा वजन कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. खरंतर, रजनी यांची लहान मुलगी सुद्धा लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त होती. अशातच, आई आणि मुलीने ही सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 3 लाख 70 हजार रुपये चार्ज केले.
मेरठच्या न्यूटीमा या खाजगी रुग्णालयात रजनी यांची बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी 55 वर्षीय रजनी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं नाव ऋषि सिंघल असल्याची माहिती समोर आली.
दुसऱ्याच दिवशी पोटात वेदना
मिळालेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी रजनी यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, सर्जरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 जुलै रोजी रजनी यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांना याबद्दल सांगितले असता त्यांनी रजनी यांना वेदना कमी होण्यासाठी औषधे सुद्धा दिली. परंतु, रजनी यांना त्या ओषधांचा काहीच फायदा झाला नाही.









