Narendra Jadhav Mumbai Tak Baithak 2025: '...तर जास्त भाषा सुरुवातीपासून मुलांवर न लादलेल्या बऱ्या', नरेंद्र जाधवांनी मांडलं रोखठोक मत
Narendra Jadhav: मुलांच्या विचारक्षमतेवर परिणाम होत असेल अधिक भाषा मुलांवर सुरुवातीपासूनच लादू नये. असं स्पष्ट मत त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मुंबई Tak बैठकमध्ये बोलताना व्यक्त केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई Tak बैठकीत त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव

पाहा नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले

त्रिभाषा सुत्रावर नरेंद्र जाधव यांचं नेमकं मत काय?
Mumbai Tak Baithak 2025 Narendra Jadhav: मुंबई: 'पहिलीपासून एवढा ताण टाकायचा का? यावर आता विचार करायची गरज आहे. जर मुलांच्या विचारक्षमतेवरच परिणाम होणार असेल तर जास्त भाषा सुरुवातीपासून न लादलेल्या बऱ्या.' असं रोखठोक मत त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मांडलं.
त्रिभाषा सूत्र याला राज्यभरात जोरदार विरोध झाला. ज्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने जीआर मागे घेतला. त्यानंतर या मुद्द्यावर नेमकं काय करता येईल यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा सूत्र समितीचं गठन करण्यात आलं.
दरम्यान, याच समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मुंबई Tak बैठकीत त्रिभाषा लागू केली गेली पाहिजे की नाही यावर अगदी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं.
पाहा मुंबई Tak बैठकीत नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले
'डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती, अशी माहिती नरेंद्र जाधव यांनी दिली. इयत्ता पहिली ते चौथी या वर्गात इंग्रजी आणि मराठीत भाषेत हिंदी सक्तीचं करावं, असं माशेलकरांनी अहवालात सांगितलं. मध्यंतरी सरकार बदललं गेल्याने माशेलकरांचा अहवाला तसाच ठेवला आणि त्याच अहवालावर जीआर काढण्यात आला होता.'
हे ही वाचा>> Sana Malik, Sneha Dube Mumbai Tak Baithak 2025: 'अजितदादांनी सांगितलंय, अजिबात सेक्युलर विचार सोडणार नाही', सना मलिक स्पष्टच बोलल्या!
'नॅशलन एज्युकेशनमध्येही त्रिभाषा सूत्राची सक्ती कुठेही केलेली नाही. महाराष्ट्रात अनेक शाळा आहेत काही अनुदानित, विनाअनुदानित, तसेच काही सरकारी शाळा आहेत. याचा अभ्यास करून त्याची आकडेवारी कोणत्या शाळेत कोणती कशी भाषा ठेवावी हे पाहू आणि पुढे पाऊल उचलू.'
'इतर भाषेचा आपल्या मातृभाषेवर तसा कोणताही परिणाम होणार नाही. पण तज्ज्ञ म्हणतात की, एकाच वेळी कोवळ्या वयात सर्वच भाषा लादल्यावर त्यांचा मानसिकरित्या त्यांचा गोंधळ होईल.'
'दरम्यान, कोव्हिड काळानंतर बऱ्यापैकी जग बदललं गेलं आहे. त्या बदलाचा शैक्षणिक धोरणाने अभ्यास घेतला नव्हता असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर संभाषणात्मक भाषा शिकणं आणि वही आणि पुस्तकाने भाषा शिकणं हे वेगळं आहे.'
हे ही वाचा>> Mumbai tak Baithak 2025: 'म' महाराष्ट्राचा, 'म' मराठीचा... मुंबई Tak बैठकीला सुरुवात, राजकीय नेते मांडणार व्हिजन!
'तज्ज्ञ म्हणतात की, एकाच वेळी कोवळ्या वयात सर्वच भाषा लादल्यावर त्यांचा मानसिकरित्या त्यांचा गोंधळ उडेल.'
'ती आपली फार गंभीर चूक ठरणार आहे'
'एक भाषा सूत्र लावणं ही आपली फार गंभीर चूक ठरणार आहे. हे पाहा.. प्रत्येक भाषा ही प्रत्येक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असते. आपल्याकडे भाषांचं जे वैविध्य आहेत ती आपली संपन्नता आहे. पण सगळ्या भाषांना एकामध्ये कोंबण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत घातक ठरणार आहे.'
'मी असं म्हणेन की खूप जास्त भाषा लादल्या तर मुलांची विचार करण्याची जी शक्ती आहे तिच्यावर जर परिणाम होत असेल, त्यांच्या उत्पादनशीलतेवर परिणाम होत असेल तर जास्त भाषा सुरुवातीपासून न लादलेल्या बऱ्या. तुम्हाला जेवढ्या भाषा शिकायच्या आहेत त्या तुम्ही नंतर शिकू शकता. परंतु पहिलीपासून एवढा ताण टाकायचा.. मला वाटतं याचा पुनर्विचार करायची गरज आहे. हेच समितीचं काम आहे.' असं स्पष्ट मत नरेंद्र जाधव यांनी मांडलं.
दरम्यान, समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यापूर्वी समितीचे सदस्य हे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, तज्ज्ञ आणि इतर महत्वाच्या घटकांशी सविस्तर चर्चा करतील. असंही नरेंद्र जाधव यावेळी म्हणाले.