चालत्या बसमध्ये झाली डिलीव्हरी! नंतर नवजात बाळाला खिडकीतून... हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

नुकतंच महाराष्ट्राच्या परभणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने बसमध्ये मुलाला जन्म दिला. परंतु, त्या नवजात बाळाला गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकण्यात आलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

नवजात बाळाला खिडकीतून... हादरवून टाकणारी घटना
नवजात बाळाला खिडकीतून... हादरवून टाकणारी घटना
social share
google news

बातम्या हायलाइट

point

परभणीतून हादरवून टाकणारी घटना

point

चालत्या बसमध्ये प्रसूती झाली अन् बाळाला खिडकीतून बाहेर...

point

नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून बाहेर फेकलं

Parbhani Crime: लेबर पेन सुरू झाल्यानंतर महिलेला गाडीतून नेत असताना वाटेतच तिची प्रसूती झाल्याच्या बऱ्याच घटना पाहायला किंवा ऐकायला मिळतात. अशी परिस्थिती उद्भवल्यास महिला आणि बाळाचं आरोग्य विचारून घेऊन त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात येतं. मात्र, नुकतंच महाराष्ट्राच्या परभणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने बसमध्ये मुलाला जन्म दिला. परंतु, त्या नवजात बाळाला गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकण्यात आलं. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

कपड्यात गुंडाळून बसच्या बाहेर... 

परभणीमध्ये एका 19 वर्षीय महिलेने स्लीपर कोच बसमध्ये आपल्या मुलाला जन्म दिला. मात्र, त्या महिलेने आणि तिचा पती असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने त्या नवजात बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं. या घटनेत त्या बाळाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 6:30 वाजता पाथरी सेलु रोडवर ही घटना घडली. त्यावेळी कापडात गुंडाळलेली एक वस्तू बसमधून बाहेर फेकण्यात आल्याची माहिती तिथल्या एका नागरिकाने पोलिसांना दिली.

नवजात बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितिका ढेरे नावाची महिला अल्ताफ शेख नावाच्या व्यक्तीसोबत संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसमधून पुण्याहून परभणीला जात होती. महिलेच्या सोबत असलेला व्यक्ती तिचा पती असल्याचा दावा करत होता. प्रवासादरम्यान, महिलेला लेबर पेन सुरू झाले आणि त्यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, त्या जोडप्याने आपल्या नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून खिडकीतून बाहेर फेकलं.

हे ही वाचा: Mumbai tak Baithak 2025: 'म' महाराष्ट्राचा, 'म' मराठीचा... महाराष्ट्राचं राजकारण आणि विकासावर होणार विचारमंथन!

महिलेत्या पतीने काय सांगितलं?  

बसच्या ड्रायव्हरने बसमधून कपड्यात गुंडाळलेली वस्तू बाहेर फेकली असल्याचं पाहिलं. त्यावेळी ड्रायव्हरने त्यांना याबद्दल विचारले असता आपल्या पत्नीला उल्टी झाल्यामुळे ती कपड्यात भरून फेकलं असल्याचं शेखने सांगितलं. मात्र, बसच्या बाहेर रस्त्यावर फेकलेलं ते बाळ तिथल्या एका नागरिकाने पाहिलं आणि त्याने लगेच पोलिसांना याबद्दल कळवलं.

त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी लगेच त्या बसचा पाठलाग केला. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनाची तपासणी करून त्यांनी आरोपी महिला आणि तिचा पती असल्याचा दावा  करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाचं पालनपोषण करण्यास असमर्थ असल्याकारणाने त्यांनी आपल्या नवजात बाळाला खिडकीतून बाहेर फेकून दिलं.

हे ही वाचा: पळून जाऊन केलं लग्न, आठवड्यानंतर पत्नीला घेऊन हॉटेल रुममध्ये गेला, पण मित्रांनी...

आरोपी जोडप्याविरोधात तक्रार दाखल  

पोलिसांच्या मते, ढेरे आणि शेख परभणीचे रहिवासी होते आणि मागील दोन वर्षांपासून ते पुण्यात राहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितली की आरोपींनी एकमेकांचे पती आणि पत्नी असल्याचा दावा केला परंतु, याबाबत कोणतेच दस्ताऐवज सादर करण्यात आले नाहीत. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या उपचारासाठी तिला रुग्णालयात नेलं. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, परभणीच्या पाथरी पोलीस स्टेशन परिसरात आरोपी जोडप्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp