Mumbai tak Baithak 2025: 'म' महाराष्ट्राचा, 'म' मराठीचा... मुंबई Tak बैठकीला सुरुवात, राजकीय नेते मांडणार व्हिजन!

मुंबई तक

Mumbai Tak Baithak 2025 Schedule: महाराष्ट्रातील अनेक महापालिका निवडणुका या येत्या काही महिन्यात पार पडतील. याचनिमित्त राज्यातील राजकीय पक्ष हे मुंबई Tak बैठकीत आपलं व्हिजन मांडणार आहेत. आज (16 जुलै) ‘मुंबई Tak बैठक’ पार पडणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak Baithak 2025
Mumbai Tak Baithak 2025
social share
google news

Mumbai Tak Baithak 2025: मुंबई: महाराष्ट्रातील सर्वच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडतील. त्यामुळे यासाठी आतापासूनच रण पेटलं आहे. अशावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू झालं आहे. या सगळ्या राजकीय रणधुमाळीत मुंबई Tak आपल्यासाठी घेऊन आलं आहे खास 'बैठक'.

ज्यामध्ये आपल्याला दिग्गज नेत्यांचं व्हिजन आणि पुढील राजकारण यावरची खुमासदार चर्चा आज (16 जुलै) रोजी ‘मुंबई Tak बैठक’ (Mumbai Tak Baithak) मध्ये पाहायला मिळेल.

मुंबई Tak बैठकचा हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), यांच्या विशेष मुलाखती होतील. आज (16  जुलै) सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या सगळ्या मुलाखती आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर LIVE पाहता येत.

'मुंबई Tak बैठक'मध्ये कोण-कोण येणार?

सकाळी 11 वाजता या सोहळ्याचे पहिले प्रमुख पाहुणे हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेले तरूण आमदार रोहित पाटील, स्नेहा दुबे आणि सना मलिक हे असणार आहेत. त्यानंतर त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत दुसरं सत्र पार पडणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp